Jump to content

परशुराम नारायण पाटणकर

परशुराम नारायण पाटणकर (जन्म : चासकमान - पुणे जिल्हा, इ.स. १८६०; - इ.स. १९३९) हे एक संस्कृत पंडित, मराठी निबंधकार आणि कवी होते. मराठी भाषेचे उत्तरी भारतातून दक्षिणेकडे संक्रमण झाले असा सिद्धान्त त्यांनी मांडला होता.

पाटणकरांच्या अनेक कविता ’काव्यरत्‍नावली’त प्रसिद्ध झाल्या होत्या.

शिक्षण आणि अध्यापन

१८८५ साली बी.ए. आणि १८९८ साली एम.ए. झाल्यानंतर पाटणकर यांनी इंदूर आणि बनारस येथे संस्कृतचे अध्यापन केले. पुढे देवासच्या संस्थानात ते राजाचे खासगी चिटणीस व शिक्षणाधिकारी बनले. इ.स. १९१८मध्ये पाटणकर बनारसच्या हिंदू विश्वविद्यालयात रिलिजन इन्स्ट्रक्टर म्हणून नोकरीला लागले. त्यांनी १९२४ सालापासून काशीहून धर्मसंगती नावाचे संस्कृत मासिक चालविले.

परशुराम नारायण पाटणकरांची पुस्तके

  • चेतोहर या नावाने जयदेवकृत ’गीतगोविंदा’चे समवृत्त मराठी भाषांतर, १८८९)
  • मराठी भाषेच्या माहेराचे सिंहावलोकन (अनेक भारतीय भाषांमधून मराठीशी नाते दाखविणारे शब्द हु्डकून काढून त्यांच्या व्युत्पत्त्या दाखवणारा शोधनिबंध, १९०७)
  • मल्लरिराज प्रशस्ति (संस्कृत काव्य, १९२०)
  • वीरधर्मदर्पण (महाभारतातील अभिमन्यूवधापासून जयद्रथवधापर्यंतच्या कथाभागावर आधारित संस्कृत नाटकाचे मराठी रूपांतर) (नरहर शंकर रहाळकरांनीही या वीरधर्मदर्पण नावाच्या संस्कृत नाटकाचे मराठी रूपांतर केले आहे.)
  • काव्यादर्श, किरातार्जुनीय, रघुवंश, शाकुंतल, शिशुपालवध वगैरे संस्कृत पुस्तकांवर विद्यार्थ्यांच्या उपयोगी पडतील अशी इंग्रजी गाइडे.