परदेशी वित्तप्रेषण
परदेशी वित्तप्रेषण[१] (इंग्लिश: Remittance, रेमिटन्स) म्हणजे परदेशस्थ कामगाराने त्याच्या किंवा तिच्या मायदेशी पाठवलेला पैसा होय. बऱ्याच विकसनशील देशांमध्ये परदेशस्थ स्थलांतरितांनी मायदेशी पाठवलेला पैसा, ही दुसऱ्या क्रमांकाची मोठी वित्तीय आवक असून आंतरराष्ट्रीय साह्यापेक्षाही अधिक आहे. जागतिक बँकेच्या अंदाजानुसार इ.स. २००९ साली विकसनशील देशांत ३१६ अब्ज अमेरिकन डॉलर एवढे वित्तप्रेषण पोचले [२].