Jump to content

परग्रह

सूर्याव्यतिरिक्त इतर कोणत्याही ताऱ्याभोवती फिरणाऱ्या ग्रहाला परग्रह म्हणतात. १९९२ पर्यंत परग्रहांच्या अस्तित्वाची कल्पना शास्त्रज्ञांना नव्हती. १९९२ मध्ये पहिल्या परग्रहाचा शोध लागला. त्यानंतर, १ मार्च २०१७ पर्यंत २,६९२ ग्रहमालांमध्ये ३,५८६ परग्रहांचा शोध लागला आहे. त्यामधील ६०३ ग्रहमालांमध्ये एकापेक्षा जास्त परग्रह आहेत.[] यांपैकी दोन हजाराहून जास्त परग्रहांचा शोध नासाच्या केप्लर दुर्बिणीने लावला आहे.[] त्याशिवाय केप्लरने तीन हजाराहून जास्त संभाव्य परग्रहांचा शोध लावला आहे. परग्रहांचे थेट निरीक्षण करणे अत्यंत अवघड (अनेक वेळा अशक्य) असल्याने त्यांचा शोध अप्रत्यक्ष पद्धतीने घेतला जातो. त्यामुळे संभाव्य परग्रहातील किती खरे परग्रह आहेत हे खात्रीशीर सांगणे अवघड आहे.

सुमारे पाच पैकी एका सूर्याएवढ्या आकाराच्या ताऱ्याभोवती पृथ्वीएवढ्या आकाराचा परग्रह त्या ताऱ्याच्या वास्तव्ययोग्य क्षेत्रामध्ये परिभ्रमण करतो असा अंदाज लावला जातो. म्हणजे आकाशगंगेमध्ये २०० अब्ज तारे आहेत असे मानले, तर असा अंदाज लावता येतो की, आकाशगंगेमध्ये पृथ्वीएवढ्या आकाराचे संभाव्य वास्तव्ययोग्य ११ अब्ज ग्रह आहेत.[]

संदर्भ

  1. ^ श्नायडर जे. "इंटरॅक्टिव्ह एक्स्ट्रा-सोलर प्लॅनेट्स कॅटॅलॉग" (इंग्रजी भाषेत).
  2. ^ क्लेव्हिन व्हीटनी, फेलिशिया चोऊ, मिशेल जॉन्सन. "नासाच्या केप्लर दुर्बिणीने लावला १०००व्या परग्रहाचा शोध" (इंग्रजी भाषेत). 6 January 2015 रोजी पाहिले.
  3. ^ अमीना खान. "आकाशगंगेमध्ये पृथ्वीच्या आकाराचे अब्जावधी ग्रह असू शकतात" (इंग्रजी भाषेत). 6 January 2015 रोजी पाहिले.