पन्नालाल घोष
साचा:भारतीय शास्त्रीय वादक पंडित पन्नालाल घोष (जन्म : २४ जुलै इ.स. १९११ - - २० एप्रिल इ.स. १९६०) हे एक श्रेष्ठ बासरी वादक होेते. त्यांचे पूर्ण नाव अमल ज्योती घोष असे होते. त्यांनी बासरी या वाद्यात अनेक सुधारणा केल्या, तसेच बासरी वादन हे भारतीय गायकीच्या जवळ नेऊन ठेवले.
जीवन
घरातील वातावरण संगीतमय होते. त्यांचे वडील पं. अक्षयकुमार घोष हे उत्तम सतार वादक होते त्यांच्याकडे पं. पन्नालाल ह्यांचे प्रारंभीच शिक्षण झाले. त्यांना
पं. गिरीजाशंकर चक्रवर्ती ह्यांचे मार्गदर्शन लाभले. पं. पन्नालाल ह्यांनी अथक परीश्रम करून ख्याल, उपशास्त्रीय व सुगम संगीत बासरीवर वाजवायला शिकले. मंद्र व तार सप्तकासाठी स्वतंत्र बासरीचा वापर ही त्यांची खासीयत होती.
शास्त्रीय संगीत बासरीवर व्यवस्थीत वाजवता यावी म्हणुन घोषबाबुंनी खुप संशोधन करून बांबुचीच पण जाड व लांब बासरीचा आविष्कार केला. सात छीद्रांची बासरी हा ही त्यांचाच अविष्कार आहे.
घोषबाबुंनी दीपावली, जयंत, चंद्रमौली, नुपुरध्वनी हे नवीन राग संगीत क्षेत्रास दिले. कलींगविजय व ऋतुराज ह्या वाद्यवृंदांची रचना त्यांनी केली.
१९३४ साली न्यु थीयीटर च्या श्री रामचंद्र बोरालजी ह्यांनी त्यांना आपल्या कंपनीत बासरी वादनाची नोकरी दिली. नंतर त्यांनी आकाशवाणी तही नोकरी केली. बसंत, झुला सारख्या चित्रपटांचे संगीत दिग्दर्शनही त्यांनी केले.
कारकीर्द
पंडितजी १९४० साली मुंबई येथे वास्तव्यास होते. त्यांनी बॉम्बे टॉकीजमध्ये संगीत दिग्दर्शकाचे आणि बासरीवादनाचे काम केले. न्यु थीयटर मधे बासरी वादक म्हणुन त्यांनी सुरुवात केली. ते आकाशवाणीतही वाद्यवृंद संचलन करत असत.
उल्लेखनीय घटना
पंडितजींनी बासरीत आमूलाग्र परिवर्तन घडविले, बासरीची लांबी ४०-४२ इंचांपर्यंत वाढविली. तसेच बासरीवर बोटे ठेवण्याचे वेगळे तंत्र विकसित केले. तसेच पंडितजींनी अनेक नवीन रागांची निर्मिती केली त्यातील राग जयंत हा एक महत्त्वाचा राग आहे.
पुरस्कार
बाह्य दुवे
- The Lecay of Pannalal Ghosh, A Resource page at (The Herb Alpert School of Music at CalArts) Archived 2007-06-30 at the Wayback Machine.
- PannalalGhosh.info Archived 2018-03-22 at the Wayback Machine.