Jump to content

पद (व्याकरण)

मराठी भाषेतील वाक्यात शब्दांचा नव्हे तर पदांचा वापर केला जातो. जसे घोडा शब्दाचे मुळरूप घोड असेल तर 'घोडा, घोडी, घोडे, घोड्या' ही 'घोड' शब्दाची सामान्यरूपे आहेत. सामान्य-रूपाला उपसर्ग, प्रत्यये किंवा सामासिक शब्द जोडले जाऊन सामान्यरूपातील शब्दांचे पद बनते. जसे वरील उदाहरणात दिलेल्या 'घोडा, घोडी, घोडे, घोड्या' इत्यादी सामान्य-रूपांची वेगवेगळी असंख्य पद रूपे संभवतात; उदा. घोडनवरा, घोडदळ, घोडागाडी, घोडीचे, घोड्यावरून, घोड्यांवरून, घोड्यांकरिताचे, इत्यादी. 

मराठी व्याकरणाचा अभ्यासाची सुरुवात इंग्रजी व्याकरण, संस्कृत व्याकरण यांच्या प्रभावाखालील शब्दांच्या जातींचा विचार होत राहिल्यामुळे मराठी भाषेचे पदरूप या वैशिष्ट्याकडे मराठी व्याकरणाच्या अभ्यासात दुर्लक्ष होत राहिले आहे.

या दुर्लक्षाचा दुष्परिणाम मराठी भाषा इंग्रजी शाळातून किंवा इतर भाषिकांना शिकवताना तसेच शुद्धलेखनाच्या मार्गदर्शनात त्रुटी राहून होतो.