पद्मा सुब्रह्मण्यम
भारतीय नर्तकी | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | फेब्रुवारी ४, इ.स. १९४३ चेन्नई | ||
---|---|---|---|
नागरिकत्व |
| ||
शिक्षण घेतलेली संस्था |
| ||
व्यवसाय |
| ||
वडील |
| ||
भावंडे |
| ||
पुरस्कार |
| ||
| |||
पद्मा सुब्रह्मण्यम (जन्म ४ फेब्रुवारी, १९४३:चेन्नई, तमिळनाडू) एक भारतीय शास्त्रीय भरतनाट्यम नर्तकी आहे. त्या एक संशोधन विद्वान, नृत्यदिग्दर्शक, संगीतकार, शिक्षक, इंडोलॉजिस्ट आणि लेखक देखील आहे. त्या भारतात तसेच परदेशातही प्रसिद्ध आहे; त्यांच्या सन्मानार्थ जपान, ऑस्ट्रेलिया आणि रशियासारख्या देशांनी अनेक चित्रपट आणि माहितीपट बनविले आहेत. "भारत नृत्यम" या नृत्य प्रकाराची निर्माता आणि संस्थापक म्हणून त्या परिचित आहे.
त्यांचे वडील के सुब्रह्मण्यम एक चित्रपट निर्माते व स्वातंत्र्यता सैनिक होते. त्यांची आई मीनाक्षी एक संगीतकार आणि गीतकार होत्या. त्यांचे नृत्य शिक्षक सुप्रसिद्ध नर्तक वझुवर रामैया पिल्लई होते. मायळापोरच्या कपिलेश्वर मंदिरातल्या देवदासी गौरीअम्मा कडून नाट्य व नृत्य शिकल्या. गौरीअम्मांनी रुक्मिणीदेवी अरुंडेल आणि बालसरस्वती यांना पण शिकविले होते.[१]
वयाच्या १४ व्या वर्षी त्यांनी वडिलांच्या शाळेत नृत्य शिकवायला सुरुवात केली. त्यांना असे वाटले की इतिहास, सिद्धांत आणि नृत्य यात काही अंतर आहे आणि त्या स्वतःच संशोधन करू लागली ज्याने हे अंतर कमी होइल. सुब्रह्मण्यमयांनी कर्नाटक संगीत पद्धतीत मास्टर्स पदवी मिळवली आहे.[२] त्या त्यांच्या एका "नृत्य शस्त्रक्रिया" अभिनयासाठी देखील प्रसिद्ध आहे. यामध्ये, त्या हार्ट सर्जनचे कार्य करतात ज्या विविध परिचारिकांसह व्हीलचेयरवर बसलेल्या रूग्णावर काम करत आहेत. त्या म्हणाल्या की भरतनाट्यमच्या चाली, नियम आणि विषय एक कठोर संच आहेत असा जो भ्रम प्रसरला आहे तो दूर करण्यासाठी त्यांनी हे नृत्य सादर केले होते जे यूट्यूब वर पण प्रसिद्ध आहे. भारत आणि अन्य देशांमधील सांस्कृतिक संबंध या विषयावर त्यांनी आग्नेय आशियातील विविध विद्यापीठांमध्ये व्याख्याने दिली आहेत. त्यांनी नृत्य आसनांमध्ये पीएचडी केली आहे आणि त्यांचे मार्गदर्शक पुरातत्त्वशास्त्रज्ञ कुथुर रामकृष्णन श्रीनिवासन होते.[३][४]
पुरस्कार
पद्मा यांना १९८१ मध्ये पद्मश्री पुरस्कार आणि २००३ मध्ये पद्मभूषण पुरस्कार मिळाला, जे भारताच्या सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी एक आहेत. यासह, त्यांच्या नृत्य कारकिर्दीत त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. १९८३ साली संगीत नाटक अकादमी ने नृत्यासाठी त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्रदान केला होता. १९९०-९१ साली मध्य प्रदेश सरकारचा कालिदास सन्मान पुरस्कार त्यांना बहाल करण्यात आला. १९९४ मध्ये जापान मधील फुकूओका पुरस्कार पण त्यांनी जिंकला. २०१५ मध्ये केरळ सरकारच्या पर्यटक विभागाने त्यांना निशागांधी पुरस्कार दिला.[५][६]
- पद्मश्री पुरस्कार (१९८१)
- संगीत नाटक अकादमी पुरस्कार (१९८३)
- कालिदास सन्मान पुरस्कार (१९९०-९१)
- फुकूओका पुरस्कार (१९९१)
- पद्मभूषण पुरस्कार (२००३)[७]
- निशागांधी पुरस्कार (२०१५)[८]
संदर्भ
- ^ "Classically endowed". Deccan Herald (इंग्रजी भाषेत). 2019-09-15. 2019-10-20 रोजी पाहिले.
- ^ Khanna, Shailaja (2019-05-10). "Padma Subrahmanyam on a new style of dance called 'Bharatanrytam'". The Hindu (इंग्रजी भाषेत). ISSN 0971-751X. २४ फेब्रुवारी २०२० रोजी पाहिले.
- ^ Narthki.com
- ^ Nrithyodhaya Website
- ^ Webindia123
- ^ Narthki.com
- ^ "Padma Awards" (PDF). Ministry of Home Affairs, Government of India. 2015. 2015-10-15 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. July 21, 2015 रोजी पाहिले.
- ^ "Nishagandhi Puraskaram 2014". Kerala Tourism Department. 2016-01-29 रोजी पाहिले.