Jump to content

पतंग

पतंग पातळ तावबांबूच्या कामट्या वापरून बनवितात.ह्याला दोऱ्याच्या सहायाने आकाशात उडविले जाते. पतंग उडविताना मांजाची चक्री धरण्यास एक व पतंगाला ढील देण्यास एक, अश्या दोन व्यक्ती लागतात. पतंगाची दोरी म्हणजेच 'मांजा'काचेचा (वस्त्रगाळ) भुगा आणि शिजवलेल्या भातात घोळवला जातो. यामुळे तो कडक बनतो व इतर पतंग काटू शकतो. बारीक असलेला बरेली मांजा उत्कृष्ट मानला जातो. आणि पतंग हा मकर संक्रातिला पण काही जण उडवतात

पतंगीच्या दुकानाचे दृश्य

गुजरातमध्ये अमदाबाद येथे 'उत्तरायण' या नावाने पतंग महोत्सव साजरा होतो. सध्याची पिढी पतंग उडवणे विसरत आहे.

इतिहास

पतंगाचा शोध प्राचीन आहे. पहिला पतंग चीनमध्ये उडवला गेला असे उल्लेख आढळतात. बेंजामिन फ्रॅन्कलिन या शास्त्रज्ञाने ढगांमध्ये विद्युत उर्जा असतात हे पतंगाच्या दोराला धातूच्या तारा बांधून सिद्ध केले होते. भारतात संक्रातीला व २६ जानेवारीला पतंग उडवण्याची प्रथा आहे.

मान्यतेनुसार, त्रेतायुगातील मकर संक्रांतीच्या दिवशी प्रभू श्रीरामाने आपल्या भावांसह आणि हनुमानासह पतंग उडवले. तेव्हापासून मकर संक्रांतीच्या दिवशी पतंग उडविण्याची परंपरा सुरू झाली. या दिवशी स्नान, पूजा आणि दान यांचे खूप महत्त्व आहे.

कार्य

पतंग हा एक पंखच आहे. पतंगाला दोन समान भाग असतात. हे भाग सारख्या आकाराचे असल्याने पतंग समतोल बनतो. पतंगाच्या काड्या, शेपूट व आकार यावर पतंग कसा उडेल हे ठरते. पतंग हवेमुळे वर आकाशात जातो. वाऱ्याचा वेग मर्यादित स्वरूपात असेल तर पतंग चांगले उडतात. पतंगाचे निमुळते टोक त्याला हवेत वर जाण्यास मदत करते. वर जातांना पतंगाचा उडण्याचा कोन वाऱ्याला अडवतो व त्याचे दोन भाग करतो. पतंगाच्या वर हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो. पतंगाच्या खालील बाजूला जास्त दाबाचा पट्टा म्हणजेच हवेची उशी तयार होते. पतंगाचा मांजा (दोरा) पतंगाला ओढ देतो त्यामुळे पतंग खालील भागात असलेल्या हवेच्या उशी स्वार होतो. त्यामुळे तो खालून वर ढकलला जात राहतो.

उपयोग

संदेश पाठवणे हवामानाचा अभ्यास करणे ते माणसांची वाहतूक करण्याचे प्रयत्न या सर्वांसाठी पतंगांचा उपयोग झाला आहे. बोअर युद्धात टेहळणीसाठी आणि माणसांना वाहून नेण्याकरिता पतंगांचा उपयोग करण्यात आला होता. इतिहासात शत्रुसैन्याला घाबरवण्यासाठी पतंगांचा वापर केला गेला. मोठ्या पतंगाचा उपयोग त्यावर काही सामाजिक जागरूकतेचे संदेश, घोषणा, राजकीय पक्षाच्या प्रचाराशी संबंधित माहितीसाठीही केला जातो.

पतंगांची नावे

पतंगाना,त्याच्या आकृतीनुसार व त्यावर असलेल्या सुशोभीकरणानुसार व उडविणाऱ्याचे वैशिष्ट्य जपावे म्हणून वेगवेगळी नावे देण्यात येतात.या नावांत फारसी शब्द जास्त आहेत.

नावे: लंगोटदार(वरचे टोकापासून खालचे टोकापर्यंत असलेला रंगीत तावाचा पट्टा),टोकदार(फक्त टोकावर रंगीत), सब्बलदार, पटलेदार(रंगीबेरंगी आडवे पट्टे असलेली),मुछाकडा,आॲंखेदार,सिंगदार,चाॲंददार
आकारानुसार:चिल (सर्वसाधारण रुंदीपेक्षा, रुंदी जास्त असणारी),चिन्नाकडी(छोटी पतंग), धड्डा(खूप मोठी पतंग)

त्यात(सुशोभीकरणानुसार) या नावांची सरमिसळ करूनही अनेक इतर नावे बनतात.

लंगोट-टोक-मुछाक,