Jump to content

पठार

पठार म्हणजे पर्वतावर असलेला साधारणतः सपाट प्रदेश आहे.त्याचे निर्माण ज्वालामुखी, लाव्हारस, पाण्याद्वारे किंवा हिमनगाद्वारे होणारी झीज अश्यासारख्या भौगोलिक घडामोडींमुळे होते.तिबेटचे पठार हे त्याचे उदाहरण आहे.[ चित्र हवे ]

जगातील प्रसिद्ध पठार

दख्खनचे पठार हे मध्य भारतातील एक मोठे पठार आहे. या पठाराचा बराचसा भाग महाराष्ट्र राज्यात आहे . नर्मदेच्या दक्षिणेला हा त्रिकोणी प्रदेश आहे.मेघालय पठार आणि त्याच्याशी ्संबंधित ईशान्येकडील डोंगराचा समूह हा दख्खनचा पठाराचा एक भाग आहे.दख्खनच्या पठाराच्या मुख्य भागापासून तो गंग्येच्या मुखाकडील मैदानामुळ्ये आणि सुंदरबनच्या प्रदेशामुळे अलग झाला आहे.सातपुडा पर्वतरांगांच्या दक्षिणेला असलेल्या दख्खनच्या पठारात अनेक पठारे सामावलेली आहे.पश्चिम घाट आणि पूर्व घाट या दख्खनच्या पठाराच्या सीमा आहेत.

महाराष्ट्राचे पठार मुख्यत: अग्निजन्य(बेसाल्ट) खडकापासून बनले आहे. बेसाल्ट खडकांचे थर जवळ जवळ क्षितिजसमांतर आहेत आणि त्यामुळे संपूर्ण भूस्वरूपाची रचना पा-य्रांसारखी झाली आहे.या बेसाल्ट खडकांच्या रचनेला 'डेक्कन ट्रयाप ' म्हणले जाते . कर्नाटक-तेलंगाना पठार मुख्यत: कानाश्म आणि पत्तीताश्म खडकांनी बनलेले आहे. कर्नाटकचे पठार 'मैदान' या नावाने ओळखले जाते . महाराष्ट्रातील पठाराना सडे म्हणतात