पट्टेरी पिंगळा
आशियाई पट्टेरी पिंगळा (Glaucidium cuculoides) ही एक पिंगळा पक्षाची प्रजाती आहे. हा भारतीय उपखंडातील उत्तरी भागांमध्ये राहणारा पक्षी आहे. तसेच दक्षिणपूर्व आशियाच्या काही भागात, उत्तर, मध्य व पूर्वोत्तर देशांमध्ये हा पक्षी आढळून येतो. भारत, नेपाळ, भूतान, उत्तर बांगलादेश, आणि दक्षिणपूर्व आशियामध्ये म्यानमार, थायलंड, कंबोडिया , लाओस, व्हिएतनाम या देशांमध्ये देखील आढळतो. हा पक्षी समशीतोष्ण वनात राहतो.[१]
संदर्भ
- ^ "पिंगळा (Owlet)". marathivishwakosh.org. १० फेब्रुवारी २०२२ रोजी पाहिले.