Jump to content

पटवा हवेली

जैसलमेर Archived 2020-10-09 at the Wayback Machine.[] शहरात असलेली "पटवोंकी हवेली" अर्थात "पटवा हवेली" वास्तुकला व शिल्पकलेचा नितांतसुंदर नमुना म्हणावा लागेल.

ठराव्या शतकात शेठ पटवा यांनी ही हवेली उभारली. गर्भश्रीमंत असलेले पटवा यांचा व्यापार देश,विदेशात पसरलेला होता.आपल्या अंतिम काळी जैसलमेर येथे राहण्यासाठी त्यांनी ही हवेली बांधून घेतली होती.

सोनेरी पिवळसर रंगाच्या वालुकाश्म दगडात शिल्पकाम करून ही हवेली तयार केली आहे.पाच हवेल्यांचा समूह असलेली ही हवेली जमिनीपासून ८ ते १० फुट उंच चबुतऱ्या वर उभारली आहे.एकूण सात मजली हवेलीचा तळमजला जमिनी खाली व सहा मजले जमिनीच्या वर आहेत.

तळमजला स्वयंपाक,साहित्य व पाणी इत्यादीसाठी वापरला जात होता,तर वरील मजले राहण्यासाठी उपयोगात आणले जात होते.


हवेलीचा बाह्यभाग व अंतर्भाग नक्षीदार शिल्पकामाने सजवलेला आहे.सोनेरी शिल्पकाम,वेलबुट्ट्या,प्राणी व पक्षी यांचे आकार,हस्तिदंत यांचा वापर या हवेलीच्या सजावटीसाठी केलेला आहे.

  1. ^ "जैसलमेर मधील पर्यटन स्थळे :Jaisalmer Tourist Places in Marathi. |" (इंग्रजी भाषेत). 2020-09-06. 2020-10-09 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-10-01 रोजी पाहिले.