Jump to content

पगार

पगार हा नोकरदाराने केलेल्या कामाचा नियतकालाने देण्यात येणारा मोबदला होय. यासाठी काम देणारा व काम करणारा यांच्यात मोबदला व करण्याचे काम यांबद्दल करार झालेला असणे अपेक्षित असते. अशा करारात नोकरीचा काळ सहसा अमर्याद असतो परंतु काही वेळेस ठराविक मुदतीच्या करारासाठी काम करताना या मुदतीपेक्षा कमी वेळाने असा मोबदला दिला जातो.

असा मोबदला सहसा मासिक, द्वैमासिक (महिन्यातून दोन वेळा) द्विसाप्ताहिक किंवा साप्ताहिक दिला जातो. रोज दिला जाणाऱ्या मोबदल्यास रोजंदारी म्हणले जाते. रोजंदारीमध्ये नोकरीचा कालावधी दर दिवशी संपतो.