पखाल
पखाल ही प्राण्याच्या चामड्यापासून तयार केलेली एक प्रकारची मोठी पिशवी असते.[ चित्र हवे ] सुदूर क्षेत्रात, पूर्वी पाणी पंपिंगची सोय नसल्यामुळे तिचा वापर पाण्याच्या स्रोतापासून घरापर्यंत अथवा कोणत्याही ठिकाणापर्यंत आवश्यक असणारे पाणी अथवा द्रवपदार्थ म्हैस अथवा रेड्यावरून वाहून नेण्यासाठी करण्यात येत होता.यासाठी मनुष्यबळ वापरण्यात येत होते.
असे पाणी वाहून नेणाऱ्या व्यक्तीस 'पखालची' अथवा 'पखालजी' असे संबोधण्यात येत असे. पूर्वीच्या काळी कोळी समाजातील लोक हा व्यवसाय करीत असत, त्यावरून त्यांस पानभरे कोळी किंवा पानकोळी म्हणून संबोधित असत. कोळी समाजाचा परंपरागत चालत आलेला मुख्य व्यवसाय म्हणजे गावातील बलुतेदारांना पाणी पुरविणे हा होता.त्या मोबदल्यात कोळी मिळेल त्या धान्यावर उपजीविका भागवीत होता.
पखालीची रचना ही काहीसी,पूर्ण पाठ व्यापणाऱ्या मोठ्या पण, एकच बंद असणाऱ्या सध्याच्या 'होन्डा बॅग' सारखी रहात असे. या पखालीची धारकक्षमता सुमारे १५ ते ३० लिटर रहात असे.पखाल पाठीवर वाहून नेण्यासाठी, त्यास चामड्याचे बंद असत.पाणी ओतण्यासाठी तिला निमुळते तोंड रहात असे. पखालचीस प्रती-खेपेनुसार रक्कम मेहनताना म्हणून देण्यात येत असे. पखालीतले पाणी पेयजल म्हणून वापरणे निषिद्ध समजण्यात येत असे.