Jump to content

पंतप्रधान

पंतप्रधान एक असा राजकिय नेता असतो जो की सरकारच्या कार्यकारिणी शाखेचे संचालन करीत असतो. सामान्यपणे, पंतप्रधान आपल्या देशातील संसदेचा सदस्य असतो.

पंतप्रधान किंवा इतर कोणताही मंत्री सहा महिन्यापर्यंत संसद सदस्य न राहताही पदावर विराजमान राहू शकतात परंतु त्यांना सहा महिन्याच्या आत कोणत्याही सभागृहाचा सदस्य बनावे लागेल. जर मंत्री या कालावधीत सदस्य बनण्यात अयशस्वी राहिले तर त्यांना राजिनामा द्यावा लागतो. परंतु याचा असा अर्थ अजिबात नाही की प्रत्येक वेळी सहा महिन्यांसाठी नेता सभागृहाचा सदस्य नसतानाही मंत्री पदावर विराजमान राहू शकतो. या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय खूप महत्त्वपूर्ण आहे.

प्रत्येक देशात पंतप्रधान निवडीची पद्धत वेगळी असते परंतु पंतप्रधानपदी कोणाचीही थेट निवड सहसा होत नाही. राष्ट्रातील मतदार लोकप्रतिनिधींची थेट निवड करतात व हे निवडलेले प्रतिनिधी पंतप्रधानपदासाठी अंतर्गत निवडणूक करतात. काही देशात राष्ट्राध्यक्षही पंतप्रधानाची नेमणूक करतात. भारतात हीच पद्धत आहे.पंतप्रधान हे मंत्रीमंडळाचे प्रमुख असतात.

देशांचे पंतप्रधान