Jump to content

पंडित जसराज

पंडित जसराज

पंडित जसराज
आयुष्य
जन्म २८ जानेवारी १९३०
जन्म स्थान हिसार, हरियाणा, भारत
मृत्यू १७ ऑगस्ट २०२०
मृत्यू स्थान न्यू जर्सी, अमेरिका
व्यक्तिगत माहिती
धर्म हिंदू
वांशिकत्व हिंदू
नागरिकत्व भारतीय
मूळ_गाव पिली मंदोरी, जि . हिसार, हरियाणा
देश भारत
भाषा हिंदी भाषा
पारिवारिक माहिती
वडील पंडित मोतीराम, काका जोतीराम (गायक)
जोडीदार मधुरा जसराज
अपत्ये दुर्गा जसराज (कन्या) , शारंग देव
नातेवाईक थोरले बंधू पंडित मणिरामजी
संगीत साधना
प्रशिक्षण संस्था पंडित जसराज इंडियन क्लासिकल म्युझिक अ‍ॅकेडमी संगीत विद्यालये
गुरू पंडित मणिरामजी, महाराज महाराणा जयवंतसिंगजी
गायन प्रकार हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत, अभंग,
घराणे मेवाती घराणे
संगीत कारकीर्द
कार्य इंडियन म्युझिक अकॅडमी स्थापना
पेशा गायकी
विशेष कार्य भारतीय संगीत विश्वात त्यांनी जसरंगी ही नवी संकल्पना रुजवली.
कारकिर्दीचा काळ इ.स. १९४५ पासून
गौरव
विशेष उपाधी संगीतमार्तंड
गौरव गंगुबाई हनगल जीवनगौरव
           पुरस्कार(२०१६),
           महाराष्ट्र गौरव पुरस्कार,
           पु.ल. देशपांडे जीवनगौरव पुरस्कार(२०१२),
            भारतरत्न भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत 
           जीवनगौरव पुरस्कार(२०१३)
पुरस्कार पद्मविभूषण(२०००),
                 पद्मभूषण (१९९०),
                 पद्मश्री(१९७५)  ,
                 संगीत नाटक अकादमी पुरस्कार(१९८७)
                 मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार ,
                संगीत नाटक अकादमी 
                 फेलोशिप(२०१०)
अधिक माहिती
संकीर्ण २०१९ मध्ये आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र
               संस्थेने एका लघु ग्रहा ला त्यांचे नाव दिले 
              आहे.
              असा बहुमान मिळणारे ते पहिले भारतीय 
              संगीतकार ठरले होते.
बाह्य दुवे
संकेतस्थळ

पंडित जसराज (जन्म : २८ जानेवारी १९३०, पिली मांदोरी, जिल्हा: हिस्सार, हरियाणा[]; - १७ ऑगस्ट २०२०,न्यू जर्सी-अमेरिका[]) हे हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत पद्धतीतील मेवाती घराण्याचे गायक होते. भारतीय केंद्रशासनाने संगीत क्षेत्रातील कामगिरीबद्दल इ.स. २००० साली पद्मविभूषण पुरस्कार देऊन जसराजांना गौरवले. ही ईश्वरी कला जनसामान्यांपर्यंत नेणारे आम्ही फक्त त्या ईश्वरी शक्तीचे दूत आहोत असे ते मानत.

बालपण

पंडित जसराज यांचे वडील पंडित मोतीराम मेवाती घराण्याचे गायक होते. जसराज चार वर्षाचे असतानाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. जसराजांनी सुरुवातीला तबल्याचे शिक्षण घेतले. गायकाच्या तुलनेत इतर साथीदारांना दुय्यम समजले जाते हे कळल्यामुळे ते अतिशय व्यथित झाले, आणि मग त्यांनी तबला वाजवायचे सोडून गायक बनायचे ठरवले. त्यांचे मोठे बंधू पंडित मणिरामजी यांच्याकडून त्यांनी वयाच्या चौदाव्या वर्षी प्रथम गाणे शिकायला सुरुवात केली. त्यांच्या घरात मेवाती घराण्याची गायकी होती. साणंद येथील महाराज महाराणा जयवंतसिंगजी यांना ते आध्यात्मिक गुरू मानत.

शिष्य

पंडित प्रसाद दुसाने, पंडित संजीव अभ्यंकर, तृप्ती मुखर्जी, कला रामनाथ, पंडित रतन मोहन शर्मा, शहनाई वादक लोकेश आनंद, अंकिता जोशी आणि श्वेता जव्हेरी हे त्यांचे शिष्य आहेत. त्यांनी गुरुकुल पद्धतीने शिष्यांना संगीत शिक्षण दिले. भारताबरोबरच ते अमेरिका, कॅनडा येथे संगीत शिक्षण देत असत. १९९५ मध्ये त्यांनी पंडिता तृप्ती मुखर्जी यांच्याबरोबर न्यू जर्सी येथे पंडित जसराज इन्स्टीट्यूट फॉर म्युझिकची स्थापना केली.[]

चित्रदालन

पंडित जसराज यांना मिळालेले पुरस्कार आणि सन्मान

बाह्य दुवे

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ a b "CUR_TITLE". sangeetnatak.gov.in. 2020-08-18 रोजी पाहिले.
  2. ^ a b c d e "ख्यातनाम शास्त्रीय गायक पंडित जसराज यांचे निधन | eSakal". www.esakal.com. 2020-08-18 रोजी पाहिले.
  3. ^ "Pandit Jasraj Institute for Music Research, Artistry and Appreciation". www.pjim.org. 2020-08-18 रोजी पाहिले.
  4. ^ a b "Padma Awards | Interactive Dashboard". www.dashboard-padmaawards.gov.in (इंग्रजी भाषेत). 2021-03-07 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-08-18 रोजी पाहिले.
  5. ^ "CUR_TITLE". sangeetnatak.gov.in. 2020-08-18 रोजी पाहिले.
  6. ^ "Orchestral symphony is very interesting: Pandit Jasraj". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 2014-11-18. 2020-08-18 रोजी पाहिले.
  7. ^ "JPL Small-Body Database Browser". ssd.jpl.nasa.gov. 2020-08-18 रोजी पाहिले.