पंजाबी चंदू हलवाई कराचीवाला
पंजाबी चंदु हलवाई कराचीवाला हे मुंबईमधील हलवायाचे दुकान आहे. याची स्थापना १८९६मध्ये आताच्या पाकिस्तानमध्ये असलेल्या कराची शहरात झाली.
महाराष्ट्रातल्या मुंबई जिल्ह्यातील पश्चिम रेल्वेवरील ग्रॅंट रोड स्थानकावर उतरून पश्चिमेला बेस्ट बसने अथवा शेअर टेक्सीने वाळकेश्वरला जाणाऱ्या रस्त्यावर तीनबत्ती चौकात डावीकडे हे मिठाईचे दुकान स्थित आहे.मुंबईतील हे मुख्य दुकान असून त्यांचे मध्यवर्ती कार्यालयसुद्धा येथेच स्थित आहे.मुळचे कराचीवाले असलेले हे मिठाईवाले मुंबईभर आपल्या ताज्या, शुद्ध तूपाच्या,चविष्ट, विविध प्रकारच्या मिठाईसाठी सुप्रसिद्ध आहे. येथे तयार होणाऱ्या प्रत्येक मिठाईचे अगदी काटेकोरपणे चाचणी करून शास्त्रीय पद्धतीने उत्पादन घेतले जाते.मुख्य उत्पादन ग्रॅंट रेल्वे स्थानकाच्या पूर्वेकडे असलेल्या कारखान्यात घेतले जाते व तिथूनच त्याचे मुंबईतील त्यांच्या सर्व शाखादुकानांत वितरण केले जाते. मुंबई बाहेर वसईमध्ये सुद्धा त्यांच्या दुकानाच्या शाखा आहेत आणि तीच गुणवत्ता आणि कार्यपद्धती वापरून ग्राहकसेवा दिली जाते. हा व्यवसाय पिढ्यानपिढ्या चालू असल्याने गुणवत्तेच्या कसोटीवर आणि ग्राहकांच्या विश्वासार्हतेवर आजही भक्कम पायावर उभा आहे आणि तितक्याच जोमाने बहरत आहे.