पंचमी
पंचमी ही हिंदू कालमापनातील एक तिथी आहे. साधारणपणे, अमावस्येनंतरच्या पाचव्या दिवशी शुक्ल/शुद्ध पंचमी आणि पौर्णिमेनंतरच्या पाचव्या दिवशी कृष्ण/वद्य पंचमी येते.
पंचमीला (आणि दशमी/पौर्णिमा/अमावास्येला) पूर्णा तिथी म्हणतात.
हिंदू महिन्यात येणाऱ्या पंचमींची नावे :-
- चैत्र शुक्ल पंचमी - श्री पंचमी, लक्ष्मी पंचमी. यादिवशी गुरू गोविंदसिंग यांची पुण्यतिथी असते.
- चैत्र वद्य पंचमी - खास नाव नाही. पण यादिवशी गुरू तेगबहादुर यांची जयंती असते.
- वैशाख शुद्ध पंचमी - आदि शंकराचार्य जयंती.
- वैशाख वद्य पंचमी - खास नाव नाही, पण यादिवशी संत चोखामेळा यांची पुण्यतिथी असते.
- ज्येष्ठ शुद्ध पंचमी - जैनांसाठी श्रुतपंचमी.
- आषाढ शुक्ल पंचमी - कोकिलापंचमी
- आषाढ कृष्ण पंचमी - मौना पंचमी
- श्रावण शुद्ध पंचमी - नागपंचमी
- भाद्रपद शुक्ल पंचमी - ऋषिपंचमी
- आश्विन शुक्ल पंचमी - ललितापंचमी
- कार्तिक शुद्ध पंचमी - कडपंचमी, पांडवपंचमी, लाखेनी पंचमी, लाभपंचमी; सौभाग्यपंचमी; ज्ञानपंचमी;
- मार्गशीर्ष शुक्ल पंचमी - नागपूजा पंचमी, विवाह पंचमी, विहार पंचमी, बांके बिहारी प्रकट पंचमी. बांके बिहारी प्रकटोत्सवाचा दिवस. महाराष्ट्राच्या काही भागात या दिवशी नागदिवाळी साजरी करण्याची प्रथा आहे.
- माघ शुक्ल पंचमी - श्री पंचमी, वसंत पंचमी. यादिवशी उत्तर भारतात वसंत ऋतू सुरू होतो. सरस्वती पूजनाचा दिवस.
- फाल्गुन वद्य पंचमी - रंगपंचमी