Jump to content

पंचतंत्र

हिंदू धर्मग्रंथावरील लेखमालेचा भाग
aum symbol
वेद
ऋग्वेद · यजुर्वेद
सामवेद · अथर्ववेद
वेद-विभाग
संहिता · ब्राह्मणे
आरण्यके  · उपनिषदे
उपनिषदे
ऐतरेय  · बृहदारण्यक
ईश  · तैत्तरिय · छांदोग्य
केन  · मुंडक
मांडुक्य  ·प्रश्न
श्वेतश्वतर  ·नारायण
कठ
वेदांग
शिक्षा · छंद
व्याकरण · निरुक्त
ज्योतिष · कल्प
महाकाव्य
रामायण · महाभारत
इतर ग्रंथ
स्मृती · पुराणे
भगवद्गीता · ज्ञानेश्वरी · गीताई
पंचतंत्र · तंत्र
स्तोत्रे ·सूक्ते
मनाचे श्लोक · रामचरितमानस
शिक्षापत्री · वचनामृत


पंचतंत्र (फारसीमध्ये कलीलेह ओ देम्नेह, अरबीमध्ये कलीलाह व दिम्नाह) संस्कृत व पाली भाषांतील प्राण्यांच्या बोधकथांचे संकलन आहे.

मूळ संस्कृत भाषेत असलेल्या पंचतंत्र या इ.स. ५ व्या शतकातील पुस्तकाचे लेखक विष्णू शर्मा आहेत असे मानले जाते. याचे मित्रभेद, मित्रसम्प्राप्ति, काकोलूकीयम्, लब्धप्रणाश आणि अपरीक्षितकारकम् असे पाच भाग असून त्यांत पशु-पक्षांच्या रूपकांतून माणसाला व्यवहार चातुर्य शिकवले आहे.

एका दंतकथेनुसार अमर शक्ती नावाचा राजा ’महिलारोप्य’वर राज्य करीत होता. तो उदार, न्यायप्रिय, दानी आणि प्रतापी होता. त्याला बहुशक्ती, उग्रशक्ती आणि अनंतशक्ती नावाचे तीन मूर्ख आणि व्यवहारशून्य मुले होती. राजा आपल्या मुलांच्या या मूर्खपणाला कंटाळला होता. त्याने आपल्या मंत्रिमंडळाच्या सल्ल्याप्रमाणे दवंडी देऊन एखाद्या असामान्य, हुशार गुरूचा शोध करविला. त्या दवंडीला प्रतिसाद म्हणून विष्णू शर्मा नावाचा एक ब्राह्मण राजाच्या दरबारी आला व त्याने तिन्ही राजकुमारांना त्याच्यासारखेच हुशार, व्यवहारकुशल करून दाखविण्याचा पैजेचा विडा उचलला. विष्णू शर्मा याने राजकुमारांना सांगितलेल्या या गोष्टी म्हणजेच पंचतंत्र. पंचतंत्र या नीतिकथा आहेत. कथेला मनोरंजक स्वरूप प्राप्त करणे, व्यवहारात चतुर बनवणे, धूर्तांच्या धूर्ततेचा परिचय करून देणे हा पंचतंत्राचा हेतू आहे.

या नीतिकथांची मूळ कल्पना ऋग्वेदातील मंडूक सूक्तात आहे. मंडुकांना (बेडकांना) विनोदाने 'ब्राह्मणा व्रतचारिणः' म्हणले आहे. तशीच तेथे एक मनुष्य व मासा यांची कथा येते. छांदोग्य उपनिषदात सत्यकाम जाबालाने पशुपक्ष्यांपासून उपदेश घेतला अशी माहिती मिळते.

सर्व कथा पाच तंत्रांत विभागल्या आहेत,

१.मित्रभेद २.मित्रलाभ ३.संधि- विग्रह ४.लब्ध प्रणाश ५.अपरीक्षितकारकम्

पंचतंत्राचे हिंदी-मराठी-इंग्रजी अवतार

  • अमर बालसाहित्य - पंचतंत्र (योगेश जोशी-छाया पागे). पाच पुस्तकांचा संच.
  • Classic Liturature for Children ( योगेश जोशी-अस्मिता भट). पाच पुस्तकांचा संच.
  • पंचतंत्र (आशा भालेकर)
  • पंचतंत्र (राजु भानारकर)
  • पंचतंत्र (हिंदी, राजेंद्र प्रसाद 'वकील')
  • पंचतंत्र (रा.प्र. कानिटकर)
  • पंचतंत्र (शांताराम कर्णिक)
  • पंचतंत्र - भाग १, २, ३ (हिंदी, बी.व्ही पट्टाभिराम))
  • पंचतंत्र की नैतिक कहानियॉं (हिंदी, राजेंद्र प्रसाद 'वकील')
  • पंचतंत्र की प्रेरक कहानियॉं (हिंदी, लेखक - रामकुमार)
  • पंचतंत्र भारत की नीतिकथाओं का संग्रह (तन्वीर खान)
  • पंचतंत्राच्या गोष्टी (बाबा भांड)
  • पंचतंत्रातील गोष्टी (संपूर्ण-सचित्र, बापुजी मार्तंड आंबेकर)
  • पंचतंत्रातील बालगोष्टी (जोडाक्षरविरहित, दामोदर फफे)
  • पंचतंत्रातील बोधप्रद गोष्टी (अनिल किणीकर)
  • पंचतंत्रातील मनोरंजक गोष्टी (अनिल किणीकर)
  • पंचतंत्रातील रोचक गोष्टी (अनिल किणीकर)
  • पंचतंत्रातील सुरस गोष्टी (निर्मला मोने)
  • संपूर्ण पंचतंत्र : प्रामाणिक मराठी भाषांतर (ह.अ. भावे, डॉ. रा.चिं. ढेरे)
  • सर्वांना व्यावहारिक शहाणपण शिकवणारे पंचतंत्र (संस्कृत-मराठी, नचिकेत प्रकाशन)

संदर्भ