न्यू लंडन (कनेटिकट)
न्यू लंडन हे अमेरिकेतील कनेटिकट राज्यातील एक शहर आहे. हे शहर न्यू लंडन काउंटीमध्ये वसले आहे. इ.स. २०१० च्या जनगणनेनुसार या शहराची लोकसंख्या सुमारे २७,६२० आहे.
थेम्स नदीच्या काठी वसलेले हे शहर बॉस्टनपासून १२७ किमी (१०७ मैल), प्रॉव्हिडन्स, ऱ्होड आयलंडपासून ९० किमी (५६ मैल) आणि न्यू बेडफोर्ड, मॅसेच्युसेट्सपासून २०६ किमी (१२८ मैल) अंतरावर आहे.