न्यू झीलंड महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९७१-७२
न्यू झीलंड महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९७१-७२ | |||||
ऑस्ट्रेलिया महिला | न्यू झीलंड महिला | ||||
तारीख | ५ – ८ फेब्रुवारी १९७२ | ||||
संघनायक | मिरियाम नी | ट्रिश मॅककेल्वी | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | न्यू झीलंड महिला संघाने १-सामन्यांची मालिका १–० जिंकली |
न्यू झीलंड राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने फेब्रुवारी १९७२ मध्ये १ महिला कसोटी सामने खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला होता. न्यू झीलंड महिलांनी ऑस्ट्रेलियाचा दुसऱ्यांदा दौरा केला होता. मिरियाम नीने यजमान ऑस्ट्रेलिया महिलांचे नेतृत्व केले तर पाहुण्या न्यू झीलंड महिला क्रिकेट संघाचे नेतृत्व ट्रिश मॅककेल्वीकडे होते. महिला कसोटी सोबतच न्यू झीलंडने अनेक स्थानिक महिला क्रिकेट संघांशी सराव सामने खेळले.
एकमेव महिला कसोटी मेलबर्न येथील जंक्शन ओव्हल मैदानावर खेळविण्यात आली ज्यात न्यू झीलंड महिलांनी ऑस्ट्रेलियावर संघावर १४३ धावांनी विजय मिळवला. न्यू झीलंड महिलांचा हा पहिला महिला कसोटी विजय होता.
महिला कसोटी मालिका
एकमेव महिला कसोटी
५-८ फेब्रुवारी १९७२ धावफलक |
न्यूझीलंड | वि | |
- नाणेफेक: न्यू झीलंड महिला, फलंदाजी.
- न्यू झीलंड महिलांचा पहिला महिला कसोटी विजय.
- बेव विल्सन, डॉन रे, लेस्ली जॉन्स्टन, मार्गरेट जेनिंग्स, रायली थॉम्पसन, शर्ली बॅनफील्ड, टिना मॅकफर्सन, वेंडी ब्लंस्डेन (ऑ), एलीन व्हाइट, लीझ ॲलन आणि लिंडा प्रीचर्ड (न्यू) या सर्वांनी महिला कसोटी पदार्पण केले.