Jump to content

न्यू झीलंड क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०२१-२२

न्यू झीलंड क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०२१-२२
भारत
न्यू झीलंड
तारीख१७ नोव्हेंबर – ७ डिसेंबर २०२१
संघनायकरोहित शर्मा (ट्वेंटी२०)
अजिंक्य रहाणे (१ली कसोटी)
विराट कोहली (२री कसोटी)
टिम साउदी (१ली,२री ट्वेंटी२०)
मिचेल सँटनर (३री ट्वेंटी२०)
केन विल्यमसन (१ली कसोटी)
टॉम लॅथम (२री कसोटी)
कसोटी मालिका
निकालभारत संघाने २-सामन्यांची मालिका २–० जिंकली
सर्वाधिक धावामयंक अगरवाल (२४२) टॉम लॅथम (१६३)
सर्वाधिक बळीरविचंद्रन अश्विन (१४) एजाज पटेल (१७)
मालिकावीररविचंद्रन अश्विन (भारत)
२०-२० मालिका
निकालभारत संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली
सर्वाधिक धावारोहित शर्मा (१५९) मार्टिन गुप्टिल (१५२)
सर्वाधिक बळीहर्षल पटेल (४)
अक्षर पटेल (४)
टिम साउदी (४)
मिचेल सँटनर (४)
मालिकावीररोहित शर्मा (भारत)

न्यू झीलंड क्रिकेट संघाने नोव्हेंबर - डिसेंबर २०२१ दरम्यान दोन कसोटी सामने आणि तीन आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी भारताचा दौरा केला. कसोटी मालिका २०२१-२३ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धे अंतर्गत खेळवली गेली. सप्टेंबर २०२१ मध्ये भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने दौऱ्याचे वेळापत्रक जारी केले.

नोव्हेंबरमध्ये झालेल्या २०२१ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषकनंतर भारताचे मुख्य प्रशिक्षक रवि शास्त्री यांनी पदत्याग केला. त्यांच्याजागी राहुल द्रविड यांची भारताच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली. तसेच विश्वचषकानंतर विराट कोहलीने भारताच्या ट्वेंटी२० संघाच्या कर्णधारपदावरून राजीनामा दिला. त्यामुळे उपकर्णधार रोहित शर्माला भारताच्या ट्वेंटी२० संघाच्या कर्णधारपदी कायमस्वरुपी नियुक्ती करण्यात आली. तर पहिल्या कसोटी सामन्यासाठी अजिंक्य रहाणेला कर्णधार केले गेले. विराट कोहली विश्रांती घेऊन झाल्यानंतर दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारताचे कर्णधारपद सांभाळेल असे बीसीसीआयतर्फे जाहीर केले गेले. ट्वेंटी२० मालिकेपूर्वी कसोटी मालिकेच्या लक्ष देण्यासाठी केन विल्यमसनने ट्वेंटी२० सामने न खेळण्याचे ठरवले. त्यामुळे टिम साउदीला ट्वेंटी२० मालिकेसाठी न्यू झीलंडचा कर्णधार केले गेले.

भारताने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका ३-० अश्या फरकाने जिंकली. न्यू झीलंडला मायभूमीवर भारताने ट्वेंटी२० मालिकेत पहिल्यांदाच व्हाइटवॉश केले. पहिल्या कसोटीत पाचव्या दिवसअखेरीस भारताला विजयासाठी एक गडी पाहिजे असताना खराब प्रकाशामुळे सामना अनिर्णित ठेवावा लागला. ही कसोटी अनिर्णित सुटल्यामुळे न्यू झीलंडने सर्वाधिक सलग १० कसोटी सामन्यांमध्ये अपराजीत राहण्याचा विक्रम केला. केन विल्यमसन दुखापतग्रस्त झाल्याने दुसऱ्या कसोटीत टॉम लॅथमने न्यू झीलंडचे नेतृत्व केले. १८८८-८९ नंतर ही पहिलीच अशी वेळ होती जेव्हा दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत चार खेळाडूंनी दोन्ही संघांचे कर्णधारपद भूषविले होते. दुसऱ्या कसोटीत पहिल्या डावात न्यू झीलंडच्या एजाज पटेलने सर्वच्या सर्व १० बळी मिळवले. एकाच डावात सर्व १० बळी मिळवणारा एजाज हा जगातला तिसरा तर न्यू झीलंडचा पहिला खेळाडू ठरला. यापूर्वी इंग्लंडच्या जिम लेकर आणि भारताच्या अनिल कुंबळे या दोघांनी अशी कामगिरी केली होती. भारताने दुसऱ्या कसोटीत ३७२ धावांनी विजय मिळवत कसोटी मालिका १-० ने जिंकली.

आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका

१ला सामना

१७ नोव्हेंबर २०२१
१९:०० (दि/रा)
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
१६४/६ (२० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
१६६/५ (१९.४ षटके)
मार्टिन गुप्टिल ७० (४२)
रविचंद्रन अश्विन २/२३ (४ षटके)
भारत ५ गडी राखून विजयी.
सवाई मानसिंग मैदान, जयपूर
पंच: के.एन. अनंतपद्मनाभन (भा) आणि विरेंदर शर्मा (भा)
सामनावीर: सूर्यकुमार यादव (भारत)
  • नाणेफेक : भारत, क्षेत्ररक्षण.
  • व्यंकटेश अय्यर (भा) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.


२रा सामना

१९ नोव्हेंबर २०२१
१९:०० (दि/रा)
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
१५३/६ (२० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
१५५/३ (१७.२ षटके)
ग्लेन फिलिप्स ३४ (२१)
हर्षल पटेल २/२५ (४ षटके)
लोकेश राहुल ६५ (४९)
टिम साउदी ३/१६ (४ षटके)
भारत ७ गडी राखून विजयी.
जेएससीए आंतरराष्ट्रीय मैदान संकुल, रांची
पंच: अनिल चौधरी (भा) आणि जयरामण मदनगोपाळ (भा)
सामनावीर: हर्षल पटेल (भारत)
  • नाणेफेक : भारत, क्षेत्ररक्षण.
  • हर्षल पटेल (भा) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.


३रा सामना

२१ नोव्हेंबर २०२१
१९:०० (दि/रा)
धावफलक
भारत Flag of भारत
१८४/७ (२० षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
१११ (१७.२ षटके)
रोहित शर्मा ५६ (३१)
मिचेल सँटनर ३/२७ (४ षटके)
भारत ७३ धावांनी विजयी.
ईडन गार्डन्स, कोलकाता
पंच: के.एन. अनंतपद्मनाभन (भा) आणि विरेंदर शर्मा (भा)
सामनावीर: अक्षर पटेल (भारत)
  • नाणेफेक : भारत, फलंदाजी.


१ली कसोटी

२५-२९ नोव्हेंबर २०२१
कसोटी अजिंक्यपद स्पर्धा
धावफलक
भारत Flag of भारत
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
३४५ (१११.१ षटके)
श्रेयस अय्यर १०५ (१७१)
टिम साउदी ५/६९ (२७.४ षटके)
२९६ (१४२.३ षटके)
टॉम लॅथम ९५ (२८२)
अक्षर पटेल ५/६२ (३४ षटके)
२३४/७घो (८१ षटके)
श्रेयस अय्यर ६५ (१२५)
काईल जेमीसन ३/४० (१७ षटके)
१६५/९ (९८ षटके)
टॉम लॅथम ५२ (१४६)
रविंद्र जडेजा ४/४० (२८ षटके)
सामना अनिर्णित.
ग्रीन पार्क, कानपूर
पंच: नितीन मेनन (भा) आणि विरेंदर शर्मा (भा)
सामनावीर: श्रेयस अय्यर (भारत)


२री कसोटी

भारत Flag of भारत
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
३२५ (१०९.५ षटके)
मयंक अगरवाल १५० (३११)
एजाज पटेल १०/११९ (४७.५ षटके)
६२ (२८.१ षटके)
काईल जेमीसन १७ (३६)
रविचंद्रन अश्विन ४/८ (८ षटके)
२७६/७घो (७० षटके)
मयंक अगरवाल ६२ (१०८)
एजाज पटेल ४/१०६ (२६ षटके)
१६७ (५६.३ षटके)
डॅरियेल मिचेल ६० (९२)
रविचंद्रन अश्विन ४/३४ (२२.३ षटके)
भारत ३७२ धावांनी विजयी.
वानखेडे स्टेडियम, मुंबई
पंच: अनिल चौधरी (भा) आणि नितीन मेनन (भा)
सामनावीर: मयंक अगरवाल (भारत)


१९५५-५६ | १९६४-६५ | १९६९-७० | १९७६-७७ | १९८८-८९ | १९९५-९६ | १९९९-२००० | २००३-०४ | २०१०-११ | २०१२ | २०१६-१७ | २०१७-१८ | २०२१-२२ | २०२२-२३