न्यू झीलंड क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, २०२१-२२
न्यू झीलँड क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, २०२१-२२ | |||||
पाकिस्तान | न्यू झीलँड | ||||
तारीख | १७ सप्टेंबर – ३ ऑक्टोबर २०२१ | ||||
संघनायक | बाबर आझम | टॉम लॅथम | |||
एकदिवसीय मालिका | |||||
२०-२० मालिका |
न्यू झीलँड क्रिकेट संघाने तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने (वनडे) आणि पाच आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी सप्टेंबर-ऑक्टोबर २०२१ दरम्यान पाकिस्तानचा दौरा नियोजित केला होता. न्यू झीलँडचा हा २००३ नंतरचा पहिला दौरा असणार होता.
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका ही २०२०-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीग अंतर्गत खेळवली जाणार होती. परंतु सप्टेंबर २०२१ मध्ये असे स्पष्ट झाले की पंच निर्णय पुनरावलोकन प्रणाली पाकिस्तानमध्ये उपलब्ध नसल्याने एकदिवसीय मालिका सुपर लीग अंतर्गत धरण्यात येणार नाही.
पहिल्या आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना सुरू होण्याच्या ३ तास आधी न्यू झीलँडने दौरा रद्द करण्याचा एकतर्फी निर्णय घेतला. न्यू झीलँड सरकारला सुरक्षेच्या निगडीत असलेली एक गुप्त आणि महत्त्वाच्या सतर्कतेच्या इशाऱ्यावरून दौरा रद्द करण्यात येत असल्याचे ट्वीट न्यू झीलँड क्रिकेट बोर्डाने केले. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे नवनियुक्त अध्यक्ष रमीझ राजा यांनी न्यू झीलँडनी घेतलेल्या एकतर्फी निर्णयाची आलोचना केली. पाकिस्तानचा माजी खेळाडू शोएब अख्तर याने "आताच न्यू झीलँड कडून पाकिस्तानी क्रिकेटचा खून झाला" अश्या आशयाचे ट्वीट केले. आमच्याकडे दौरा रद्द करण्याव्यतिरिक्त दुसरा कुठलाही पर्याय नव्हता असे विधान न्यू झीलँड क्रिकेटचे सी.ई.ओ. डेव्हिड व्हाइट यांनी केले.