न्यू झीलंड क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, २०२२
न्यू झीलंड क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, २०२२ | |||||
इंग्लंड | न्यू झीलंड | ||||
तारीख | २ – २७ जून २०२२ | ||||
संघनायक | बेन स्टोक्स | केन विल्यमसन (१ली कसोटी) टॉम लॅथम (२री कसोटी) | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | इंग्लंड संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | ज्यो रूट (३९६) | डॅरियेल मिचेल (५३८) | |||
सर्वाधिक बळी | मॅटी पॉट्स (१४) | ट्रेंट बोल्ट (१६) | |||
मालिकावीर | ज्यो रूट (इंग्लंड) आणि डॅरियेल मिचेल (न्यू झीलंड) |
न्यू झीलंड क्रिकेट संघाने तीन कसोटी सामने खेळण्यासाठी जून २०२२ मध्ये इंग्लंडचा दौरा केला. कसोटी मालिका २०२१-२३ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धा अंतर्गत खेळविली गेली. दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटीच्या दरम्यान इंग्लंड संघाने नेदरलँड्समध्ये तीन वनडे सामने खेळले. एप्रिल २०२२ मध्ये वेस्ट इंडीजविरुद्ध कसोटी मालिकेत पराभव झाल्यामुळे ज्यो रूटने इंग्लंडच्या कसोटी कर्णधारपदावरून राजीनामा दिला. बेन स्टोक्स याला इंग्लंडच्या कर्णधारपदी नियुक्त केले गेले.
कसोटी मालिकेआधी न्यू झीलंडने दोन सराव सामने खेळले. पहिली कसोटी इंग्लंडने जिंकत मालिकेत दणक्यात सुरुवात केली. चौथ्या डावात माजी कर्णधार ज्यो रूट याने शतक झळकावण्यासोबतच कसोटी क्रिकेट मध्ये १०,००० धावांचा टप्पा ओलांडला. दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटीत विजय मिळवून तीन सामन्यांची कसोटी मालिका ३-० ने जिंकली.
सराव सामने
चार-दिवसीय सामना:ससेक्स वि न्यू झीलंड
चार-दिवसीय सामना:प्रथम-श्रेणी काउंटी XI वि न्यू झीलंड
२०२१-२३ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धा - कसोटी मालिका
१ली कसोटी
न्यूझीलंड | वि | |
- नाणेफेक: न्यू झीलंड, फलंदाजी.
- मॅट पार्किन्सन आणि मॅटी पॉट्स (इं) या दोघांनी कसोटी पदार्पण केले.
- दुखापतग्रस्त असलेल्या जॅक लीचची मॅट पार्किन्सनने कसोटीमध्ये इंग्लंडकडून पुर्णवेळ बदली खेळाडू म्हणून जागा घेतली.
- कसोटी अजिंक्यपद स्पर्धा गुण : इंग्लंड - १२, न्यू झीलंड - ०.
२री कसोटी
न्यूझीलंड | वि | |
- नाणेफेक: इंग्लंड, क्षेत्ररक्षण.
- मायकेल ब्रेसवेल (न्यू) याने कसोटी पदार्पण केले.
- कसोटी अजिंक्यपद स्पर्धा गुण : इंग्लंड - १०[n १], न्यू झीलंड - ०.
३री कसोटी
न्यूझीलंड | वि | |
- नाणेफेक: न्यू झीलंड, फलंदाजी.
- जेमी ओव्हरटन (इं) याने कसोटी पदार्पण केले.
- कसोटी अजिंक्यपद स्पर्धा गुण : इंग्लंड - १२, न्यू झीलंड - ०.
नोंदी
- ^ दुसऱ्या कसोटीमध्ये धीम्या गोलंदाजीसाठी इंग्लंडचे कसोटी विश्वचषकामधून २ गुण कापण्यात आले.