न्यू जलपाईगुडी जंक्शन रेल्वे स्थानक
न्यू जलपाईगुडी নিউ জলপাইগুড়ি भारतीय रेल्वे स्थानक | |
---|---|
फलक | |
स्थानक तपशील | |
पत्ता | सिलिगुडी, पश्चिम बंगाल |
गुणक | 26°40′58″N 88°26′36″E / 26.68278°N 88.44333°E |
समुद्रसपाटीपासूनची उंची | ११४ मी |
मार्ग | हावडा−न्यू जलपाईगुडी रेल्वेमार्ग बरौनी-गुवाहाटी मार्ग दार्जीलिंग हिमालयन रेल्वे |
फलाट | ८ |
इतर माहिती | |
उद्घाटन | इ.स. १९६१ |
विद्युतीकरण | नाही |
संकेत | NJP |
मालकी | रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे |
विभाग | उत्तर पूर्व सीमा रेल्वे |
स्थान | |
न्यू जलपाईगुडी |
न्यू जलपाईगुडी रेल्वे स्थानक हे भारताच्या पश्चिम बंगाल राज्यातील जलपाइगुडी जिल्ह्याच्या जलपाइगुडी व सिलिगुडी ह्या जुळ्या शहरांमधील प्रमुख रेल्वे स्थानक आहे. ईशान्य भारताचे प्रवेश्द्वार समजले जाणारे न्यू जलपाईगुडी स्थानक भारतातील सर्वात वर्दळीच्या रेल्वे स्थानकांपैकी एक आहे. पश्चिम बंगालमधून आसामसह ईशान्येच्या राज्यांकडे धावणाऱ्या सर्व गाड्या न्यू जलपाईगुडीमार्गेच जातात.
इ.स. १९४७ मधील भारताच्या फाळणीनंतर बंगाल व आसाम भागांमधील रेल्वे वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली. ह्यामुळे सिलिगुडीचे रेल्वे जंक्शन म्हणून महत्त्व वाढीस लागले. १९६० साली भारतीय रेल्वेने अनेक नॅरोगेज व मीटर गेज मार्गांचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करण्यास सुरुवात केली व सिलिगुडीच्या दक्षिणेस नवे स्थानक उभारण्याचा निर्णय घेतला. १९६१ साली उघडले गेलेले न्यू जलपाईगुडी स्थानक लवकरच उत्तर बंगालमधील सर्वात वर्दळीचे स्थानक बनले. दार्जीलिंग ह्या लोकप्रिय पर्यटनस्थळाकडे जाण्यासाठी न्यू जलपाईगुडी येथून दार्जीलिंग हिमालयन रेल्वे सुटते.
प्रमुख गाड्या
- दिब्रुगढ राजधानी एक्सप्रेस
- पूर्वोत्तर संपर्क क्रांती एक्सप्रेस
- न्यू जलपाईगुडी-हावडा शताब्दी एक्सप्रेस
- कोलकाता-गुवाहाटी - गरीब रथ एक्सप्रेस
- सियालदाह-गुवाहाटी - कांचनगंगा एक्सप्रेस
- हावडा-दिब्रुगढ - कामरूप एक्सप्रेस
- दिल्ली आनंद विहार-गुवाहाटी - नॉर्थ ईस्ट एक्सप्रेस