न्युर्नबर्ग
न्युर्नबर्ग Nürnberg (जर्मन) | ||
जर्मनीमधील शहर | ||
| ||
न्युर्नबर्ग | ||
देश | जर्मनी | |
राज्य | बायर्न | |
क्षेत्रफळ | १८६.४ चौ. किमी (७२.० चौ. मैल) | |
समुद्रसपाटीपासुन उंची | ९९१ फूट (३०२ मी) | |
लोकसंख्या (३१ डिसेंबर २०१०) | ||
- शहर | ५,०५,६६४ | |
- घनता | २,७१३ /चौ. किमी (७,०३० /चौ. मैल) | |
- महानगर | ३५,००,००० | |
प्रमाणवेळ | मध्य युरोपीय प्रमाणवेळ | |
nuernberg.de |
न्युर्नबर्ग (जर्मन: Nürnberg, इंग्लिश उच्चारः न्युरेम्बर्ग, Nuremberg) हे जर्मनीच्या बायर्न राज्यामधील एक शहर आहे. न्युर्नबर्ग फ्रांकोनिया ह्या भौगोलिक क्षेत्रात म्युनिक शहराच्या १७० किमी उत्तरेस पेग्निट्झ नदीच्या काठावर वसले आहे.
११व्या शतकात स्थापन झालेले न्युर्नबर्ग पवित्र रोमन साम्राज्यामधील एक महत्त्वाचे स्थान होते. साम्राज्याची संसद व न्यायालय न्युर्नबर्गच्या किल्ल्यात भरत असत. १३व्या शतकात न्युर्नबर्ग हे युरोपमधील एक मोठे व्यापार केंद्र होते. नाझी जर्मनीच्या कालावधीत न्युर्नबर्ग हे अॅडॉल्फ हिटलरचे एक अत्यंत महत्त्वाचे लष्करी केंद्र होते. हिटलरने ज्यूविरोधाचे कायदे मंजूर करण्याकरिता राइचश्टागला न्युर्नबर्ग येथे बैठक घेण्याचे आदेश दिले होते. दुसऱ्या महायुद्धामध्ये न्युर्नबर्गची मोठ्या प्रमाणावर हानी झाली. युद्ध संपल्यानंतर होलोकॉस्ट व इतर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या नाझी लष्करी अधिकाऱ्यांवर न्युर्नबर्ग येथेच खटले भरण्यात आले होते.
सध्या न्युर्नबर्ग हे जर्मनीमधील एक मोठे व्यापारी व औद्योगिक शहर आहे. अनेक महामार्ग येथे येउन मिळत असल्याने व आपल्या भौगोलिक स्थानामुळे पूर्व व मध्य युरोप सोबत जर्मनीच्या व्यापाराचे न्युर्नबर्ग हे महत्त्वाचे केंद्र आहे.
खेळ
फुटबॉल हा न्युर्नबर्गमधील सर्वात लोकप्रिय खेळ आहे. जर्मनीमधील बुंदेसलीगामधून खेळणारा १. एफ.से. न्युर्नबर्ग हा संघ येथेच स्थित आहे. येथील फ्रांकनस्टेडियोनमध्ये १९७२ उन्हाळी ऑलिंपिक व २००६ फिफा विश्वचषकामधील फुटबॉल सामने खेळवले गेले होते.
जुळी शहरे
न्युर्नबर्गचे जगातील खालील शहरांसोबत सांस्कृतिक व व्यापारी संबंध आहेत.
- नीस
- क्राकूफ[१]
- स्कोप्ये[२]
- ग्लासगो
- सान कार्लोस
- गेरा
- प्राग
- खार्कीव्ह
- हडेरा
- शेन्झेन
- अंताल्या
- कवाला
- अटलांटा
- व्हेनिस
संदर्भ
- ^ "Kraków otwarty na świat". www.krakow.pl. 2009-07-19 रोजी पाहिले.
- ^ "Official portal of City of Skopje — Skopje Sister Cities". © 2006–09 City of Skopje. 2018-12-25 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2009-07-14 रोजी पाहिले. External link in
|publisher=
(सहाय्य)
हे सुद्धा पहा
बाह्य दुवे
- अधिकृत संकेतस्थळ
- विकिव्हॉयेज वरील न्युर्नबर्ग पर्यटन गाईड (इंग्रजी)