नोव्हेंबर ३
नोव्हेंबर ३ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३०७ वा किंवा लीप वर्षात ३०८ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
अठरावे शतक
एकोणिसावे शतक
- १८३८ - द टाइम्स ऑफ इंडियाची द बॉम्बे टाइम्स ॲण्ड जर्नल ऑफ कॉमर्स या नावाने स्थापना
विसावे शतक
- १९०३ - शेव्हरोलेची स्थापना
- १९१८ - पोलंड रशीया पासून स्वतंत्र
- १९८८ - श्रीलंकेतून आलेल्या तमिळ भाडोत्री सैनिकांनी मालदीववर हल्ला केला. तेथील सरकारच्या विनंतीवरून भारतीय सैन्याने तो मोडून काढला व सरकार वाचवले
- १९९८ - पूर्वी धंदेवाईक पैलवान असलेल्या जेसी व्हेंचुराची मिनेसोटाच्या राज्यपालपदी निवड
एकविसावे शतक
- २००७ - पाकिस्तानच्या राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफनी देशाच्या सर्वोच्च न्यायाधीशांची हकालपट्टी करून देशात आणीबाणी लागू केली
जन्म
- ३९ - ल्युकान, रोमन कवि
- १६०४ - उस्मान दुसरा, ऑट्टोमन सम्राट
- १६१८ - औरंगझेब, मोगल सम्राट
- १७९३ - स्टीवन ऑस्टिन, टेक्सासचा क्रांतिकारी
- १८०१ - कार्ल बेडेकेर, जर्मन लेखक व प्रकाशक
- १८५२ - मैजी, जपानी सम्राट
- १८८४ - क्लॉड फोकेट, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू
- १८९२ - ज्यो स्मॉल, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू
- १९०० - रॉजर ब्लंट, न्यू झीलंडचा क्रिकेट खेळाडू
- १९०१ - लिओपोल्ड तिसरा, बेल्जियमचा राजा
- १९०२ - चार्ल्स जोन्स, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू
- १९१२ - आल्फ्रेदो स्त्रॉसनर, पेराग्वेचा राष्ट्राध्यक्ष
- १९२६ - व्हाल्दास आडम्कुस, लिथुएनियाचा राष्ट्राध्यक्ष
- १९३३ - अमर्त्य सेन, भारतीय अर्थतज्ञ
- १९३३ - मायकेल डुकाकिस, अमेरिकन राजकारणी
- १९३४ - डिक रिचर्डसन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू
- १९५१ - अझमत राणा, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू
- १९५९ - व्हॉन ब्राउन, न्यू झीलंडचा क्रिकेट खेळाडू
- १९६४ - ब्रायन यंग, न्यू झीलंडचा क्रिकेट खेळाडू
- १९७७ - हेमंता बोटेजु, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू
मृत्यू
- ३६१ - कॉन्स्टॅन्टियस दुसरा, रोमन सम्राट
- १२५४ - जॉन तिसरा डुकास व्हेटाट्झेस, बायझेन्टाईन सम्राट
- १९७० - पीटर दुसरा, युगोस्लाव्हियाचा राजा
- १९९६ - ज्यॉॅं-बेडेल बोकासा, मध्य आफ्रिकेच्या प्रजासत्ताकचा राष्ट्राध्यक्ष
- २००४ - शेख झायेद बिन सुल्तान अल नहायान, संयुक्त अरब अमिरातीचा राष्ट्राध्यक्ष
प्रतिवार्षिक पालन
- स्वातंत्र्य दिन- पनामा, डॉमिनिका, मायक्रोनेशिया
- संस्कृती दिन- जपान
नोव्हेंबर १ - नोव्हेंबर २ - नोव्हेंबर ३ - नोव्हेंबर ४ - नोव्हेंबर ५ - नोव्हेंबर महिना
बाह्य दुवे
- बीबीसी न्यूजवर नोव्हेंबर ३ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)