नोव्हेंबर १४
नोव्हेंबर १४ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३१७ वा किंवा लीप वर्षात ३१८ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
विसावे शतक
- १९१८ - चेकोस्लोव्हाकिया प्रजासत्ताक झाले.
- १९२२ - बी.बी.सी.चे रेडियो प्रसारण सुरू झाले.
- १९४० - दुसरे महायुद्ध - इंग्लंडच्या कोव्हेंट्री शहरावर लुफ्तवाफेने तुफान बॉम्बफेक करून शहर जवळजवळ नष्ट केले.
- १९४१ - दुसरे महायुद्ध - जर्मनीच्या पाणबुडीने युनायटेड किंग्डमची एच.एम.एस. आर्क रॉयल ही विमावाहू नौका बुडवली.
- १९६९ - अपोलो १२चे प्रक्षेपण.
- १९७० - सदर्न एरवेझ फ्लाइट ९३२ हे विमान हंटिंग्टन, वेस्ट व्हर्जिनिया शहराजवळ कोसळले. मार्शल युनिव्हर्सिटीच्या फुटबॉल संघासह ७५ ठार.
- १९७१ - मरीनर ९ हे अंतराळयान मंगळाच्या कक्षेत पोचले.
- १९७५ - स्पेनने पश्चिम सहारातून पळ काढला.
- १९९१ - रॉयल ओक, मिशिगन शहरात कामावरून काढून टाकलेल्या पोस्टमनने चार व्यक्तींना ठार केले व पाच इतरांना जखमी करून आत्महत्या केली.
एकविसावे शतक
- २००१ - उत्तरेतील सैन्याने काबूल जिंकले.
- २००२ - आर्जेन्टिनाने जागतिक बँकेचे ८०.५ कोटी अमेरिकन डॉलरचे देणे परत करण्यास असमर्थता दर्शवली.
- २०१३ - सचिन तेंडुलकर याची क्रिकेट निवृत्ती.
जन्म
- १६५० - विल्यम दुसरा, इंग्लंडचा राजा.
- १८४० - क्लोद मोने, फ्रेंच चित्रकार.
- १८४३ - ऍलन हिल, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १८८९ - जवाहरलाल नेहरू, प्रथम भारतीय पंतप्रधान
- १९०४ - हॅरोल्ड लारवूड, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९०८ - जोसेफ मॅककार्थी, अमेरिकन साम्यवाद-द्वेष्टा.
- १९२२ - बुट्रोस बुट्रोस-घाली, संयुक्त राष्ट्रांचा सरचिटणीस.
- १९२४ - रोहिणी भाटे, मराठी कथकनर्तिका.
- १९३० - ऍलन मॉस, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९३५ - हुसेन, जॉर्डनचा राजा.
- १९४२ - इंदिरा गोस्वामी, आसामी साहित्यिक, कवयित्री, संपादिका.
- १९४२ - जॅकी दु प्रीझ, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
- १९४८ - चार्ल्स, वेल्सचा राजकुमार.
- १९५३ - दॉमिनिक दि व्हियेपॉं, फ्रांसचा पंतप्रधान.
- १९५४ - यानी, ग्रीक संगीतकार.
- १९७१ - ऍडम गिलक्रिस्ट, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १९७४ - ह्रषिकेश कानिटकर, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- १९७६ - हेमांग बदाणी, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- १९७७ - ब्रिजल पटेल, केन्याचा क्रिकेट खेळाडू.
मृत्यू
- ५६५ - जस्टिनियन, बायझेन्टाईन सम्राट.
- १८६६ - मिगेल, पोर्तुगालचा राजा.
- १९०८ - गुआंग्क्सु, चीनी सम्राट.
- १९१४ - वेंगायिल कुन्हीरामन नयनार, मल्याळम लेखक, पत्रकार.
- १९१५ - बूकर टी. वॉशिंग्टन, अमेरिकन संशोधक, शिक्षणतज्ञ, लेखक.
- १९७७ - ए.सी. भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद, भारतीय तत्त्वज्ञानी.
- १९७७ - नारायण हरी आपटे, मराठी लेखक, मराठी चित्रपटांचे पटकथाकार.
- २०२३ - सुब्रत रॉय, भारतीय उद्योजक
प्रतिवार्षिक पालन
- बालदिन - भारत.
नोव्हेंबर १२ - नोव्हेंबर १३ - नोव्हेंबर १४ - नोव्हेंबर १५ - नोव्हेंबर १६ - (नोव्हेंबर महिना)
बाह्य दुवे
- बीबीसी न्यूजवर नोव्हेंबर १४ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)