Jump to content

नोर-पा-द-कॅले

नोर-पा-द-कॅले
Nord-Pas-de-Calais
फ्रान्सचा प्रदेश
ध्वज
चिन्ह

नोर-पा-द-कॅलेचे फ्रान्स देशाच्या नकाशातील स्थान
नोर-पा-द-कॅलेचे फ्रान्स देशामधील स्थान
देशफ्रान्स ध्वज फ्रान्स
राजधानीलील
क्षेत्रफळ१२,४१४ चौ. किमी (४,७९३ चौ. मैल)
लोकसंख्या४०,३३,१९७
घनता३२५ /चौ. किमी (८४० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२FR-O
संकेतस्थळhttp://www.nordpasdecalais.fr/

नोर-पा-द-कॅले (मराठी लेखनभेद: नॉर-पा-द-कॅले ; फ्रेंच: Nord-Pas-de-Calais ) हा फ्रान्स देशाचा एक भूतपूर्व प्रशासकीय प्रदेश आहे. हा प्रदेश फ्रान्सच्या उत्तर भागात इंग्लिश खाडीवरबेल्जियम देशाच्या सीमेवर वसला आहे. लील ही नोर-पा-द-कॅलेची राजधानी व सर्वांत मोठे शहर तर कॅले हे दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. नोर-पा-द-कॅले हा फ्रान्समधील चौथ्या क्रमांकाचा सर्वाधिक लोकसंख्या घनतेचा प्रदेश आहे. इंग्लंडमधील डोव्हर हे गाव इंग्लिश खाडीच्या पलीकडे कॅलेपासून केवळ ३४ किमी अंतरावर वसले असून ही दोन शहरे चॅनल टनेलद्वारे जोडली गेली आहेत. चॅनल टनेलमुळे ह्या प्रदेशामधील अर्थव्यवस्थेला चालना मिळाली आहे.

२०१६ साली पिकार्दी व नोर-पा-द-कॅले ह्या दोन प्रदेशांचे एकत्रीकरण करून ऑत-दा-फ्रान्स हा नवा प्रशासकीय प्रदेश बनवण्यात आला.

विभाग

नोर-पा-द-कॅले प्रशासकीय प्रदेश खालील दोन विभागांमध्ये विभागला गेला आहे.


बाह्य दुवे