नोर्मंदी
नोर्मंदी (फ्रेंच: Normandie; नॉर्मन: Normaundie) हा फ्रान्स देशामधील एक भौगोलिक प्रदेश व भूतपूर्व प्रांत आहे. फ्रान्सच्या उत्तर भागात इंग्लिश खाडीच्या किनाऱ्यावर वसलेल्या नॉर्मंदीचे क्षेत्रफळ ३०,६२७ वर्ग किमी इतके असून येथील लोकसंख्या सुमारे ३५ लाख इतकी आहे. सीन नदी नोर्मंदीमधील ला आव्र ह्या शहराजवळ इंग्लिश खाडीला मिळते. जर्सी व गर्न्सी ही दोन ब्रिटिश बेटे नॉर्मंदीच्या पश्चिमेला स्थित आहेत.
सध्या नोर्मंदी ओत-नोर्मंदी (अप्पर नॉर्मंडी) व बास-नोर्मंदी (लोअर नॉर्मंडी) ह्या दोन प्रशासकीय प्रदेशांमध्ये विभागला गेला आहे. ओत-नोर्मंदीमध्ये सीन-मरितीम व युर ह्या तर बास-नोर्मंदी ऑर्न, काल्व्हादोस व मांच ह्या विभागांमध्ये विभागला गेला आहे. रोऑं, कां व ला आव्र ही नोर्मंदीमधील मोठी शहरे आहेत.
दुसऱ्या महायुद्धादरम्यान दोस्त राष्ट्रांनी जून ६, १९४४ रोजी नोर्मंडीमधून नाझी जर्मनीवर मोठा हल्ला चढवला. येथून दुसऱ्या महायुद्धात पश्चिम युरोपमध्ये दोस्त राष्ट्रांची सरशी सुरू झाली
हे सुद्धा पहा
- गी द मोपासॉं
बाह्य दुवे
- (फ्रेंच) Normandie Héritage Archived 2007-08-24 at the Wayback Machine.