नॉर्मन बोरलॉग
नॉर्मन बोरलॉग (इंग्लिश: Norman Borlaug) (मार्च २५, इ.स. १९१४ - सप्टेंबर १२, इ.स. २००९) हे अमेरिकन कृषितज्ज्ञ होते. त्यांना हरितक्रांतीचे जनक मानले जाते. बोरलॉग यांनी गव्हाच्या रोगनिरोधक, अधिक उत्पन्न देणाऱ्या वाणांचा शोध लावला. त्यांच्या शोधामुळे मेक्सिको, भारत, पाकिस्तान इत्यादी देशांतील धान्याच्या उत्पन्नात आमूलाग्र क्रांती झाली.
डॉ. बोरलॉग यांना भारत सरकारतर्फे पद्मविभूषण पुरस्कार देण्यात आला. त्यांना इ.स. १९७० सालच्या नोबेल शांतता पुरस्कारानेही गौरवण्यात आले.