Jump to content

नैरोबी माशी

नैरोबी माशी किंवा ड्रॅगन किडा

नैरोबी माशी किंवा ड्रॅगन किडा हा एक मूळचा पूर्व आफ्रिकेतील पेडेरस या वंशातील रोव्ह बीटलच्या दोन प्रजातींचे सामान्य नाव असलेला 'संधीपाद' संघातील उडणारा कीटक आहे. सध्या हा भारत आणि भारतीय उपखंडात मोठ्या प्रमाणावर पसरलेला आहे. या किटकात पेडेरिन नावाचा संक्षारक पदार्थ असतो, जो त्वचेच्या संपर्कात आल्यास त्वचा दाह होऊ शकतो.[] या जळजळत्या वेदनेमुळे, नैरोबी माशीला कधीकधी "ड्रॅगन किडा" असे देखील म्हणतात.

वर्णन

प्रौढ कीटक हे प्रामुख्याने काळ्या आणि लाल रंगाचे असतात आणि 6-10 मिमी लांब आणि 0.5-1.0 मिमी रुंद असतात.[] त्यांचे डोके, पोटाचा खालचा भाग, एलिट्रा (पंखाचे मूळ) आणि पाठीमागचा भाग हे काळे रंगाचे असून वक्षस्थळ आणि पोटाचा वरचा भाग लाल असतो.[]

जीवशास्त्र

हे कीटक ओलसर दमट अधिवासात राहतात आणि बहुतांश ते शेतीसाठी फायदेशीर असतात कारण ते पिकावरील हानिकारक कीटक खातात. प्रौढ कीटक इनॅन्डेन्सेंट आणि फ्लोरोसेंट प्रकाशाकडे आकर्षित होतात आणि परिणामी, अनवधानाने मानवांच्या संपर्कात येतात.[]

मुसळधार पाऊस, काहीवेळा एल निनो घटनांमुळे, नैरोबी फ्लायला भरभराट होण्यासाठी परिस्थिती प्रदान करते. इस १९९८, २००७, २०१९, २०२० मध्ये यांच्या प्रजोत्पादनाचा उद्रेक झाला.[]

माणसांशी संबंध

पेडेरस त्वचारोग

ही माशी मधमाशी प्रमाणे डंख मारत नाही किंवा चावत देखील नाही, परंतु त्यांच्या हिमोलिम्फमध्ये पेडेरिन नावाचे एक शक्तिशाली विष आहे ज्यामुळे फोड येणे आणि <i id="mwIw">पेडेरस</i> त्वचारोग होतो. जेव्हा हे कीटक त्वचेवर चिरडले किंवा घासले जातात तेव्हा हे विष सोडले जाते, बहुतेकदा रात्रीच्या वेळी ही समस्या निर्माण होते. यावर उपाय म्हणून लोकांना त्वचेवरून अलगद ब्रशने, कापडाने किंवा फुंक मारून कीटक उडवण्याचा सल्ला दिला जातो. [][]

संदर्भ

  1. ^ a b c "'Nairobi fly' doesn't sting or bite, but it sure does hurt". CNN. January 26, 1998. January 28, 2007 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
  2. ^ Stefano Veraldi & Luciano Süss (1994). "Dermatitis caused by Paederus fuscipes Curt". International Journal of Dermatology. 33 (4): 277–278. doi:10.1111/j.1365-4362.1994.tb01045.x. PMID 8021088.
  3. ^ a b c Mammino, Jere J. (November 2011). "Paederus Dermatitis". The Journal of Clinical and Aesthetic Dermatology. 4 (11): 44–46. ISSN 1941-2789. PMC 3225135. PMID 22125660.