Jump to content

नेहा राजपाल

नेहा राजपाल

नेहा राजपाल
आयुष्य
जन्म २३ जून, १९७८ (1978-06-23) (वय: ४६)
जन्म स्थान डोंबिवली, महाराष्ट्र
व्यक्तिगत माहिती
नागरिकत्व भारतीय
देश भारत
भाषा मराठी, हिंदी भाषा
संगीत साधना
गायन प्रकार कंठसंगीत
संगीत कारकीर्द
कार्य पार्श्वगायन
पेशा पार्श्वगायन
कारकिर्दीचा काळ इ.स. १९९५पासून
बाह्य दुवे
संकेतस्थळ

नेहा राजपाल (जून २३, इ.स. १९७८ - )या भारतीय संगीतसृष्टी, हिंदी चित्रपट आणि विशेषतः मराठी संगीतक्षेत्र, यांमधील नामवंत गायिका व कार्यक्रमांच्या सूत्रसंचालक आहेत. त्यांनी बंगाली, तेलुगू, गुजराती, सिंधी आणि कन्नड या इतर भारतीय भाषांमध्येसुद्धा गायन केलेले आहे. नेहा राजपाल सध्या एका मराठी चित्रपटाची निर्मिती करत आहे[]. बॉलिवूडचा एक प्रसिद्ध दिग्दर्शक या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहे. चित्रपट राष्ट्रीय पुरस्कार विजेता विजय मौर्य आणि योगेश विनायक जोशी यांनी लिहिले आहे

बालपण आणि शिक्षण

त्यांचा जन्म २३ जून १९७८ मध्ये भारतातील महाराष्ट्र राज्यात असलेल्या डोंबिवली शहरात झाला. त्यांनी एम.बी.बी.एस. ही डॉक्टरची पदवी एमजीएम मेडिकल कॉलेज, कामोठे(नवी मुंबई) येथून मिळवली आहे. त्यांनी त्यांच्या गुरू विभावरी बांधवकर, यांच्याकडून किराणा घराणा पद्धतीच्या शास्त्रीय संगीताचे रीतसर शिक्षण घेतलेले आहे. संगीतकार अनिल मोहिले यांचे मार्गदर्शनसुद्धा त्यांना लाभले आहे

कारकीर्द

कोणतेही गाणे असो, शास्त्रीय, पॉप, सुगम संगीत किंवा लोकसंगीत, नेहा राजपाल यांचा गळा अगदी अचूक सूर पकडतो व श्रोत्यांना भारावून टाकतो. नेहाच्या आतापर्यंतच्या गायनक्षेत्राचा आढावा घेतला तरी त्यात वैविध्य आढळते. अगदी जिंगल, मालिका शीर्षक गीत, मराठी-हिंदी चित्रपट गीत व स्वतंत्र सोलो अल्बमपर्यंत त्यांचा प्रवास झाला आहे. महाराष्ट्रातील जनता नेहा राजपाल यांना, दूरदर्शनच्या ’सह्याद्री वाहिनी’वरील ’सह्याद्री अंताक्षरी’ या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनामुळे ओळखू लागली.

नेहा राजपाल यांनी आपले पहिले गाणे अनिल मोहिले यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली, ’तुझ्याचसाठी' या चित्रपटासाठी गायिले. त्यानंतर रामोजी राव यांचा 'चालू नवरा भोळी बायको', 'माणूस', 'लगीनघाई', 'माझं सौभाग्य' या मराठी चित्रपटांसाठी व 'नई पडोसन' या हिंदी चित्रपटासाठी त्यांनी आपला आवाज दिला. सोनी म्युझिकने नेहाचा 'ये जो मोहब्बत है' हा अल्बम बनवला आहे. मराठी चित्रपटांबरोबरच 'रामायण', 'सारा आकाश', 'भाभी', 'महाभारत', हेमा मालिनीची 'कामिनी दामिनी', 'कागज की कश्ती', 'नॉक नॉक कौन है' यासारख्या लोकप्रिय हिंदी दूरचित्रवाणी मालिकांसाठी नेहा राजपाल यांच्या आवाजाचा उपयोग करून घेण्यात आला आहे. त्यांनी 'बिर्ला व्हाईट सिमेंट', 'लेक्सी पेन' यासारख्या अनेक जाहिरातीतही गाणी म्हटली आहेत. शंकर महादेवन यांच्याबरोबरही नेहाचअनेक अविस्मरणीय मैफिली रंगवल्या आहेत. इतकंच नव्हे तर देश- परदेशातही असंख्य गायनाचे कार्यक्रम यशस्वी केले आहेत व श्रोत्यांकडून वाहवा मिळविली आहे. त्यांना मिळालेल्या पुरस्कारांची यादीही मोठी आहे. यात सुरसंगम प्रतिष्ठानचा पुरस्कार, सोनी टीव्हीवरील ’आदाब अर्ज है’ पुरस्कार आणि ’अनिल मोहिले पुरस्कार’ आदींचा समावेश आहे.

पारितोषिक आणि विजेतेपद

  • 'सारेगमप' संगीत स्पर्धेचे २००४ सालचे महाअंतिम फेरीचे विजेतेपद नेहा राजपाल यांना मिळाले आहे.
  • त्याना २००८ साली मुक्काम पोस्ट लंडन' या चित्रपटातील ’फुलणारा मौसम’ या गीतासाठी सर्वोत्कृष्ट गायिका म्हणून झी गौरव पुरस्कार मिळाला आहे.

इतर माहिती

  • मुंबईतील पवई येथील डॉ. एल.एच. हिरानंदानी रुग्णालयाने आयोजित करण्यात आलेल्या ’वर्ड एड्स दिन’ मेळाव्यात नेहा राजपाल सहभागी झाल्या होत्या. एचआयव्ही आणि एड्सबद्दल जागरूकता निर्माण करणे हा त्या मागचा उद्देश होता. या वेळी झालेल्या कार्यक्रमात त्यांनी इंडियन आयडॉल स्पर्धेचे विजेते अभिजित सावंत आणि २००५ मधील सारेगामाच्या ’सारेगम’च्या अंतिम फेरीतील स्पर्धक यांच्यासोबत सादरीकरण केले होते.
  • नेहा राजपाल या "एकोहेल्थ" संस्थेच्या संचालक आहेत.

संदर्भ

  1. ^ "संग्रहित प्रत". 2015-01-05 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2014-12-05 रोजी पाहिले.

बाह्य दुवे