Jump to content

नेपाळी भाषा

नेपाळी
नेपाली/खस कुरा/पर्वते भाषा
स्थानिक वापरनेपाळ, भारत, भूतान, तिबेट, म्यानमार
प्रदेशदक्षिण आशिया
लोकसंख्या १,७०,००,०००
क्रम ६६
भाषाकुळ
इंडो-युरोपीय


* इंडो-इराणी
 * इंडो-आर्य
  * उत्तर इंडो-आर्य
   * पूर्व पहाडी
    * नेपाळी

  • नेपाळी
लिपी देवनागरी लिपी
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापरनेपाळ ध्वज नेपाळ
सिक्किम (भारत)
पश्चिम बंगाल (भारत)
भाषा संकेत
ISO ६३९-१ne
ISO ६३९-२nep
ISO ६३९-३nep

नेपाळी भाषा (नेपाळी: नेपाली भाषा; अन्य नावे: खस कुरा, गोरखाली भाषा वा पर्वतिया भाषा) ही इंडो-युरोपीय भाषाकुळातील इंडो-आर्य शाखेतील भाषा आहे. ती नेपाळाची अधिकृत भाषा असून, तेथे बोलल्या जाणाऱ्या प्रमुख भाषांपैकी एक आहे. नेपाळाबाहेर ती भूतान, भारतम्यानमार या जवळच्या देशांमध्येही काही प्रमाणात वापरली जाते. भारतातदेखील तिला अधिकृत भाषेचा घटनात्मक दर्जा आहे. पूर्वी सार्वभौम राष्ट्र असलेल्या व वर्तमानात भारतीय प्रजासत्ताकातील घटक राज्य असलेल्या सिक्किमात नेपाळीला अधिकृत भाषेचे स्थान आहे. नेपाली भाषा खस जातिच भाषा आहेत ।

लिपी

सध्या नेपाळी भाषा देवनागरी लिपीत लिहिली जाते. ऐतिहासिक काळातील जुन्या नेपाळी दस्तऐवजांमध्ये ताकरी, भुजिमोल, रंजना या लिप्यादेखील वापरल्याचे आढळते.