Jump to content

नेपाळ

नेपाळ
संघीय लोकतान्त्रिक गणतन्त्र नेपाल
Federal Democratic Republic of Nepal
नेपाळ चा ध्वज
ध्वज
ब्रीद वाक्य: जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी।
('आई आणि मातृभूमि स्वर्गाहूनही श्रेष्ठ असते.')
राष्ट्रगीत: सयौं थुॅंगा फूलका हामी
Sayaun Thunga Phool Ka.ogg सयौं थुॅंगा फूलका हामी
नेपाळचे स्थान
नेपाळचे स्थान
नेपाळचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
काठमांडू
अधिकृत भाषानेपाळी
इतर प्रमुख भाषा नेवारी
 - राष्ट्रप्रमुखविद्यादेवी भंडारी
 - पंतप्रधानके.पी. शर्मा ओली
 - सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीशगोपाल पराजुली
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस (एकत्रीकरण)
डिसेंबर २१, १७६८ 
क्षेत्रफळ
 - एकूण १,४७,१८१ किमी (९४वा क्रमांक)
 - पाणी (%) २.८
लोकसंख्या
 -एकूण २,७१,३३,००० (४२वा क्रमांक)
 - गणती {{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता१९६/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण ४२.१७ अब्ज अमेरिकन डॉलर (८१वा क्रमांक)
 - वार्षिक दरडोई उत्पन्न१,६७५ अमेरिकन डॉलर (१५२वा क्रमांक)
राष्ट्रीय चलननेपाळी रुपया (NPR)
आंतरराष्ट्रीय कालविभागनेपाळी प्रमाणवेळ (NPT) (यूटीसी+५:४५)
आय.एस.ओ. ३१६६-१NP
आंतरजाल प्रत्यय.np
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक+९७७
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा


नेपाळ हा एक दक्षिण आशियाई देश आहे. नेपाळचे क्षेत्रफळ एक लाख ४७ हजार १८१ वर्ग किलोमीटर आहे. नेपाळ हे जगातील तीन हिंदूबहुल राष्ट्रांपैकी एक आहे. नेपाळ हे हिमालय पर्वतराजीमध्ये वसलेला भूपरिवेष्टित देश आहे. उत्तरेला चीन सीमा असून, इतर सर्व बाजूंना भारत देश आहे. नेपाळचा क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगात ९३ वा क्रमांक असून लोकसंख्येच्या दृष्टीने ४२ वा क्रमांक आहे. नेपाळ हा जगातला एकमेव असा देश आहे ज्या देशाचा राष्ट्रध्वज हा आयताक्रुती नसून तो त्रिकोणी आहे. काठमांडू नेपाळची राजधानी असून देशातील सर्वात मोठे शहर आहे. काठमांडू भागात सुमारे ५० लाखांची वस्ती आहे. नेपाळ भौगोलिकदृष्ट्या संपन्न प्रदेश आहे. उत्तरेला हिमालय पर्वतरांगा असून जगातील सर्वोच्च दहा पर्वतशिखरांमधील आठ नेपाळमध्ये आहेत. जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट, (नेपाळी : सागरमाथा) नेपाळमध्ये आहे. समुद्रसपाटीपासून २०००० फूट (६०९६ मीटर) उंचीवरील सुमारे २४० पर्वतशिखरे आहेत. दक्षिण नेपाळमध्ये जमीन शेतीसाठी अतिशय समृद्ध असल्याने दाट लोकवस्तीचा शहरी भाग अधिक आहे.

नेपाळमधील सुमारे ८०% लोक हिंदू असून टक्केवारीच्या दृष्टीने जगातील सर्वाधिक हिंदू लोकसंख्येचा देश आहे. नेपाळी जातींचा विचार केला तर येथे ३० प्रकारचे गट आढळतात. त्यात-क्षेत्री (पहाडी(पर्वतीय/डोंगरी) क्षत्रिय), बाहुन (पहाडी ब्राह्मण), मगर, थारू, नेवार, गुरूंग, तामाड, किरॉंत राई, लिंबू, यादव, शेर्पा, नेपाळी मियॉं, इत्यादींचा समावेश होतो. नेपाळी कामकाज देवनागरी लिपीत चालते. पण त्यांच्या लिपी व भाषेत ३० बोली आहेत. मात्र ‘नेवारी’ ही काठमांडूमध्ये प्रमुख भाषा आहे. नेपाळमध्ये जगातील १४ उंच शिखरांपैकी ८ आहेत. ही सर्व शिखरे ८००० मीटरपेक्षा उंच आहेत. एव्हरेस्ट शिखर ८८५० मीटर उंचीचे येथेच आहे. याला सागरमाथा म्हणतात. हवामान पाहता नोव्हेंबर ते मार्च काठमांडू थंड असते. जानेवारीमध्ये मात्र कमालीची थंडी असते. एप्रिल ते जून ३२ अंश सेल्सिअस तापमान असते. जून –जुलै मात्र येथे संपूर्ण पावसाळा असतो. इतर महिन्यात मात्र हवामान उत्तम असते.सकाळी ९ ते संध्याकाळी ६ पर्यंत इथली कार्यालये चालतात आणि शनिवार-रविवार त्यांना सुटी असते. इथले , ९०% लोक शेती आणि पर्यटन उद्योगावर आपली गुजराण करतात.यातूनच ते परकीय चलन मिळवतात. त्यांचे दरडोई २१० यु.एस .डॉलर म्हणजे १०,५००/-रुपये उत्पन्न आहे. बौद्ध धर्माचे येथे सुमारे १५% आहे, बौद्ध लोक जरी अल्पसंख्य असले तरी नेपाळशी बौद्ध धर्माचे दृढ आणि अतूट नाते आहे. नेपाळमध्ये बहुतांश वेळा राजेशाही होती. १७६८ पासून शाह घराण्याची राजवट होती. राजा पृथ्वी नारायण शाह यांच्या राजवटीमध्ये अनेक छोट्या स्वतंत्र राज्यांना एकसंध नेपाळमध्ये समाविष्ट केले गेले. नेपाळ कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली सुमारे दहा वर्ष चाललेल्या लोकचळवळीचा आणि नेपाळमधील प्रमुख राजकीय पक्षांनी सतत काही आठवडे केलेल्या संपानंतर अखेर २२ नोव्हेंबर, २००५ रोजी एक १२ कलमी मसुदा तयार करण्यात आला. २८ मे, २००८ रोजी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये जनतेने मोठ्या प्रमाणात राजे ज्ञानेंद्र यांच्या विरोधात मतदान करून संघीय लोकशाही नेपाळची स्थापना केली. २३ जुलै, २००८ रोजी राम बरन यादव यांनी नेपाळचे पहिले राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली.

चांगगु नारायण मन्दिर

इतिहास

नेपाळ येथील राजांची तलेजूभवानी कुलदेवता आहे. तलेजूभवानी म्हणजेच तुळजा भवानी होय.

दुरर्नुवकोट

भूगोल

चतुःसीमा

राजकीय विभाग

नेपाळ देश हा १४ अंचलांमध्ये विभागला गेलेला आहे.-

  • मेची अंचल
  • कोसी अंचल
  • सागरमाथा अंचल
  • जनकपूर अंचल
  • बागमती अंचल
  • नारायणी अंचल
  • गंडकी अंचल
  • लुंबिनी अंचल
  • धवलगिरी अंचल
  • राप्ती अंचल
  • कर्णाली अंचल
  • भेरी अंचल
  • सेती अंचल
  • महाकाली अंचल

मोठी शहरे

समाजव्यवस्था

वस्तीविभागणी

धर्म

नेपाळ एक धर्मनिरपेक्ष देश असून तेथे बहुसंख्याक लोक हिंदू आहेत. याशिवाय तेथे बौद्ध, मुसलमान, ख्रिस्ती धर्मीय सुद्धा आहेत.

शिक्षण

संस्कृती

राजकारण

अर्थतंत्र

नेपाळचे अर्थतंत्र पर्यटनावर आधारित आहे. यांत सामान्य पर्यटन तसेच गिर्यारोहण पर्यटन दोन्ही आहेत.

मोठ्या प्रमाणात येथील कामगार बाहेर देशात कामाला जातात. यांत भारतात कामाला येणाऱ्यांची संख्या मोठी आहे.

पुस्तक

नेपाळ किंवा नेपाळचा प्रवास या विषयावर मराठीत अनेक पुस्तके आहेत. त्यांपैकी सर्वात जुने पुस्तक संपतराव गायकवाड यांनी लिहिलेले ’नेपाळचा प्रवास’ हे आहे. हे पुस्तक इ.स. १९२८ साली प्रकाशित झाले होते.