नेत्रा कुमानन
नेत्रा कुमानन | |
वैयक्तिक माहिती | |
---|---|
राष्ट्रीयत्व | भारतीय |
निवासस्थान | चेन्नई |
जन्मदिनांक | ३१ ऑगस्ट, १९९७ |
उंची | ५ फूट ३ इंच |
खेळ | |
देश | भारत |
खेळ | नौकानयन |
खेळांतर्गत प्रकार | लेसर रेडीयल |
प्रशिक्षक | टामस इस्झेस, हंगेरी |
कामगिरी व किताब | |
ऑलिंपिक स्तर | २०२० उन्हाळी तोक्यो, जपान |
नेत्रा कुमानन (३१ ऑगस्ट १९९७)[१] ही एक भारतीय नौकानयनपटू आहे. ती भारतातील चेन्नई येथे राहते.[१] एप्रिल २०२१ मध्ये ओमान येथे झालेल्या स्पर्धेत नौकानयनातील लेसर रॅडीयल प्रकारात तिने विश्वचषक पदक जिंकले. त्यामुळे ती तोक्यो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरली.[२]
कारकीर्द
नेत्राने २०१४ आणि २०१८ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले होते. २०१८ मध्ये इंडोनेशियातील जाकार्ता येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत ती चौथी आली होती.[३]
२०२० साली मायामी, अमेरिका येथे झालेल्या नौकानयन विश्वचषक स्पर्धेत नेत्राने कांस्यपदक मिळवले.[४] नौकानयनात विश्वचषक पदक जिंकणारी ती पहिला भारतीय महिला आहे. तसेच ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारीही ती पहिली भारतीय महिला नौकानयनपटू आहे.[४]
हंगेरीचे टामस इस्झेस हे तिचे प्रशिक्षक आहेत.[५] २०१९ मध्ये तिने स्पेनमधील ग्रॅन कॅनेरीया येथे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली.[१]
शिक्षण
ती एसआरएम युनिव्हर्सिटी, वडापलानी कॅम्पसमध्ये बीटेक-मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत आहे.
कौटुंबिक पार्श्वभूमी
नेत्राच्या वडलांची सॉफ्टवेर कंपनी आहे. नेत्राच्या नौकानयनातील कारकिर्दीला तिच्या आई-वडिलांनी प्रोत्साहन दिले आहे.[५] नेत्राचा भाऊ, नवीन राष्ट्रीय पातळीवरील नौकानयन स्पर्धांमध्ये सहभागी होता.[१]
संदर्भ
- ^ a b c d "Sailing KUMANAN Nethra - Tokyo 2020 Olympics" Check
|url=
value (सहाय्य). .. (इंग्रजी भाषेत). 2021-07-15 रोजी पाहिले.[permanent dead link] - ^ Apr 7, PTI /; 2021; Ist, 21:20. "Nethra Kumanan becomes first Indian woman sailor to qualify for Olympics | Tokyo Olympics News - Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2021-07-15 रोजी पाहिले.CS1 maint: numeric names: authors list (link)
- ^ "Who is Nethra Kumanan". Olympics.com. 2021-07-15 रोजी पाहिले.
- ^ a b "Who Is Nethra Kumanan". https://www.outlookindia.com/. 2021-07-15 रोजी पाहिले. External link in
|website=
(सहाय्य) - ^ a b Apr 9, PTI / Updated:; 2021; Ist, 13:26. "From tennis and dancing to sailing, Nethra Kumanan's journey to Olympics | More sports News - Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2021-07-15 रोजी पाहिले.CS1 maint: extra punctuation (link) CS1 maint: numeric names: authors list (link)