नेटबॉल (netball) हा बास्केटबॉल ह्या खेळासोबत साधर्म्य असलेला एक सांघिक खेळ आहे. १९व्या शतकाच्या अखेरीस इंग्लंडमध्ये ह्या खेळाचा उगम झाला व हळूहळू तो जगभर पसरला. १९६० साली आंतरराष्ट्रीय नेटबॉल फेडरेशनची स्थापना केली गेली व ह्या खेळाला अधिकृत स्वरूप प्राप्त झाले. साधारणपणे हा खेळ राष्ट्रकुल परिषदेमधील देशांत लोकप्रिय आहे.
आयताकृती आकाराच्या कोर्टमध्ये हा खेळ प्रत्येकी ७ खेळाडू असलेल्या दोन संघांदरम्यान खेळला जातो. कोर्टाच्या दोन्ही बाजूंना बॉल फेकण्यासाठी रिंगा असतात ज्यांमध्ये बॉल यशस्वीपणे फेकला गेल्यास संघाला १ गूण मिळतो. ६० मिनिटे चालणाऱ्या सामन्याच्या अखेरीस अर्वाधिक गूण मिळवणारा संघ विजयी होतो.