नॅटली पोर्टमन
नॅटली पोर्टमन Natalie Portman | |
---|---|
जन्म | नॅटली हर्श्लाग (हिब्रू: נטלי הרשלג) ९ जून, १९८१ जेरूसलेम, इस्रायल |
कारकीर्दीचा काळ | १९९४ - चालू |
प्रमुख चित्रपट | स्टार वॉर्स, ब्लॅक स्वान |
नॅटली पोर्टमन (इंग्लिश: Natalie Portman; हिब्रू: נטלי הרשלג) (जून ९, इ.स. १९८१ - ) ही एक इस्रायली-अमेरिकन सिने-अभिनेत्री आहे. स्टार वॉर्स शृंखलेच्या पहिल्या तीन चित्रपटांमधील भूमिकेसाठी तसेच २०१० साली प्रदर्शित झालेल्या ब्लॅक स्वान ह्या चित्रपटासाठी ती प्रसिद्ध आहे. ब्लॅक स्वानमधील भूमिकेकरिता तिने ऑस्कर पुरस्कार, गोल्डन ग्लोब पुरस्कार व इतर अनेक पुरस्कार पटकावले.