नीरजा भनोत
नीरजा भानोत | |
---|---|
जन्म | ७ सप्टेंबर १९६३ चंदीगड, भारत |
मृत्यू | ५ सप्टेंबर, १९८६ (वय २२) कराची, पाकिस्तान |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
पेशा | हवाई सुंदरी |
नीरजा भानोत (सप्टेंबर ७, इ.स. १९६३:चंदिगढ, भारत - सप्टेंबर ५, इ.स. १९८६:कराची, पाकिस्तान) [१], ही पॅन ॲम कंपनीच्या मुंबई विभागातील विमानप्रवास सेविका होती. सप्टेंबर ५, इ.स. १९८६ रोजी झालेल्या पॅन ॲम ७३ विमानाच्या अपहरणादरम्यान प्रवाशांना वाचविताना तिचा मृत्यू झाला. नीरजा भानोत ही एक भारतीय विरांगना होती. तिने १९८६ साली जिवावर उदार होऊन बुद्धिचातुर्याने ४०० जणांचे जीव वाचविले आणि ते करताना वयाच्या २३ वर्षी शहीद झाली. ती भारतातील सर्वात लहान वयाची अशोक चक्र हाे वीरता पदक मिळविणारी भारतीय ठरली. तिला (मरणोत्तर) अशोक चक्र या भारताच्या सर्वोच्च नागरी शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अशोक चक्र मिळालेलीही ती सर्वात तरुण व्यक्ती आहे.[२]
बालपण, शिक्षण व लग्न
नीरजाचा जन्म भारतातील चंदीगड येथे झाला. ती रमा भानोत व हरीश भानोत यांची मुलगी. हरीश हे मुंबईमधले एक पत्रकार होते. नीरजाचे शिक्षण चंदीगडमधील 'सेक्रेड हार्ट सेकंडरी स्कूल', मुंबईमधील बॉम्बे स्कॉटिश स्कूल व सेंट झेविअर्स महाविद्यालय यांमधून झाले [१]
मार्च १९८५ मध्ये तिचे लग्न झाले व ती तिच्या पतीसोबत गल्फमध्ये स्थायिक झाली होती. पण हुंड्याच्या दबावामुळे ती दोन महिन्यांतच माहेरी मुंबईला परत आली. नंतर तिने पॅन ॲम कंपनीत विमान परिचारिकेसाठी अर्ज दिला. निवड झाल्यानंतर ती काही काळ मायामी येथे प्रशिक्षणासाठी गेली व नंतर पॅन ॲममध्ये खानपान सेविका (पर्सर) म्हणून दाखल झाली.[१]
कार्यकाळ
नीरजा पॅन ॲम ७३ या दुर्दैवी विमानावर वरिष्ठ पर्सर म्हणून काम करत होती. सप्टेंबर ५, इ.स. १९८६ रोजी चार सशस्त्र दहशतवाद्यांनी मुंबईहून निघालेल्या त्या विमानाचे अपहरण केले व विमान सकाळी ५ वाजता कराची विमानतळावर उतरवले. हे विमान पुढे फ्रांकफुर्ट द्वारा न्यू यॉर्कला जात होते. नीरजाने कॉकपिटमधील विमानचालकांना अपहरणाची माहिती दिली व विमान धावपट्टीवर असतांना विमानचालक, साहाय्यक विमानचालक व विमान इंजिनिअर विमानातून पळून जाऊ शकले. त्यांच्या अनुपस्थितीत नीरजाने विमानाची सूत्रे आपल्या हातात घेतली.
अपहरणकर्ते पॅलेस्टाईन येथील अबू निदाल या गटाचे सदस्य होते व त्यांना लिबियाचा पाठिंबा होता. प्रवाशांपैकी एका व्यक्तीची, तो अमेरिकन असल्याचे कळाल्यानंतर त्यांनी गोळी मारून हत्या केली. त्यांनी नीरजाला नंतर सर्व प्रवाशांचे पासपोर्ट गोळा करण्यास सांगितले. प्रवाशांमधील इतर अमेरिकन नागरिकांना मारण्याचा त्यांचा उद्देश होता. मात्र, नीरजा व तिच्या सहकाऱ्यांनी विमानातील इतर १९ अमेरिकन नागरिकांचे (१८ प्रवासी व १ विमान कर्मचारी) पासपोर्ट लपवून ठेवले. काही पासपोर्ट त्यांनी खुर्चीखाली लपवले तर काही कचऱ्यासाठीच्या पन्हळीत टाकून दिले.
जवळपास १७ तासांनंतर अपहरणकर्त्यांनी विमानात गोळीबार चालू केला व स्फोट घडवून आणले. तेव्हा नीरजाने आपत्कालीन दरवाजा उघडून अनेक प्रवाशांना बाहेर पळण्यास मदत केली. ती स्वतः इतरांच्या मदतीसाठी मागे राहिली. अंदाधुंद गोळीबार सुरू असताना तिने ३ मुलांना गोळीबारापासून वाचविण्यासाठी तिने स्वतःला त्यांच्या अंगावर झोकून दिले. तसे केल्याने गोळ्या मुलांना न लागता तिला लागल्या व त्याने तिचा मृत्यू झाला. जगभरात या शौर्यासाठी तिचे कौतुक झाले व तिला भारत सरकारने मरणोत्तर अशोक चक्र प्रदान केले.[३]
चित्रपट
नीरजा भानोतच्या शौर्यगाथेवर नीरजा नावाचा हिंदी चित्रपट निघाला. यात नीरजाची भूमिका सोनम कपूर यांनी केली होती. चित्रपटाचे दिग्दर्शक राम मधवानी होते.
नीरजा भनोत ही हरीश भनोत या हिन्दुस्थान टाइम्स मध्ये असणाऱ्या पत्रकाराची मुलगी आणि Pan Am 73 या एयरलाइंस कंपनी मध्ये सीनियर पर्सर म्हणून काम करणारी मुलगी.
५ सप्टेंबर १९८६ मध्ये पाकिस्तान मधील कराची या विमानतळावर मुंबई ते अमेरिका अश्या जाणाऱ्या Pan Am 73 एयरलाइन्सच्या विमानाला चार अतिरेक्यांनी गन पॉइंट वर वेठीस धरले. त्या विमानात ४०० प्रवासी होते. नीरजा सुद्धा याच विमानात होती. अतिरेक्यांना ते विमान त्यांना इस्रायलमधल्या कोणत्या तरी इमारतीला धड़कावयाचे होते.
विमानात पायलट नसल्यामुळे अतिरेकी विमान घेऊन जाऊ शकत नव्हते. अतिरेक्यांनी पाकिस्तान सरकारला एका पायलटची मागणी केली. पण पाकिस्तान सरकारने ती मागणी फेटाळली. अतिरेक्यांनी पाकिस्तान सरकारला वेठीस धरण्यासाठी प्रवाश्यांना मारायची धमकी दिली . त्यांनी नीरजाला सर्व प्रवाश्यांचे पासपोर्ट गोळा करायला सांगितले. त्यातून त्यांना अमेरिकन प्रवाश्यांना निवडून मारायची धमकी देऊन पाकिस्तानवर आणि अमेरिकेवर दबाव टाकू इच्छित होते.
निरजाने पासपोर्ट गोळा केले पण शिताफीने त्यातील अमेरिकन प्रवाश्यांचे पासपोर्ट लपवून बाकीचे पासपोर्ट अतिरेक्यांना दिले. त्यानंतर त्या अतिरेक्यांनी एका ब्रिटिश प्रवाश्याला मारायची धमकी देऊन पाकिस्तान सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. पण नीरजाने त्या अतिरेक्यांना समजावून त्या ब्रिटिश प्रवाश्याचे प्राण वाचविले.
नीरजाच्या एका क्षणी असे लक्षात आले की आता विमानातील इंधन संपेल आणि विमानात पूर्ण अंधार होईल. या परिस्थितीचा फायदा उठवायचा असे नीरजाने ठरविले त्याप्रमाणे तिने प्लानिंग सुरू केले. तिने प्रवाश्यांना जेवण देण्याच्या बहाण्याने विमानातील आपत्कालीन दरवाजाबद्दल माहिती देणारी पत्रक प्रवाश्यांपर्यंत पोहोचविले. नीरजाने जसा विचार केला होता तसेच घडले. थोड्या वेळाने विमानातील इंधन संपले आणि विमानात पूर्णे अंधार पसरला या परिस्थितीचा फायदा घेऊन नीरजाने विमानाचे सर्व आपत्कालीन दरवाजे उघडले. प्रवाश्यांनी देखील पटापट विमानाबाहेर उड्या मारल्या.
अतिरेक्यांच्या लक्षात ही गोष्ट आली त्यांनी बेछूट गोळीबार सुरू केला. काही प्रवाश्यांना गोळ्या लागल्या पण ते बचावले. सर्व प्रवासी विमानातून बाहेर पड़ेपर्यंत नीरजा विमानात थांबली होती. आता ती विमानातून बाहेर पडणार एतक्यात तिला एका लहान मुलांचा रडण्याचा आवाज ऐकायला आला. एव्हड्या वेळात पाकिस्तानी कमांडोज पण विमानाच्या आत पोहोचले होते. त्यांनी त्या चार अतिरेक्यांपैकी तिन जणांना मारून टाकले. नीरजा त्या मुलांना शोधून विमानाच्या बाहेर पडत होती तेवढ्यात तो चौथा अतिरेकी नीरजाच्या समोर आला. नीरजाने त्या मुलांना आपत्कालीन दरवाजाच्या बाहेर फेकून दिले आणि त्या अतिरेक्याने झाडलेल्या गोळ्या अंगावर घेतल्या. त्यातच तिचा अंत झाला. १७ तास अतिरेक्यांशी झुजंत चारशे प्रवाश्यांना वाचवून नीरजाचा झालेला अंत सर्व जगाला दुःख देऊन गेला.
नीरजाने वाचविलेल्या त्या लहान मुलांपैकी एक जण मोठा झाल्यावर वैमानिक झाला. तो त्याच्या भावना व्यक्त करताना म्हणाला, 'माझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षणावर नीरजाचा हक्क आहे.'
भारताने नीरजाला अशोक चक्र हां सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन सन्मानित केले.
पाकिस्तानने तमगा-ए-इन्सानियत हा सर्वोच्च पुरस्कार दिला.
अमेरिकेने जस्टिस फॉर व्हिक्टम ऑफ क्राईम ॲवार्ड हा वीरता पुरस्कार देऊन नीरजाला सन्मानित केले.
संदर्भ आणि नोंदी
- ^ a b c "Brave in life, brave in death by Illa Vij".
- ^ "Nominations invited for Neerja Bhanot Awards". 2008-12-05 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2013-05-17 रोजी पाहिले. Unknown parameter
|deadurl=
ignored (सहाय्य) - ^ राजघट्टा, चिदानंद. "24 yrs after Pan Am hijack, Neerja Bhanot killer falls to drone".