Jump to content

नीडरजाक्सन

नीडर जाक्सन
Niedersachsen
जर्मनीचे राज्य
ध्वज
चिन्ह

नीडर जाक्सनचे जर्मनी देशाच्या नकाशातील स्थान
नीडर जाक्सनचे जर्मनी देशामधील स्थान
देशजर्मनी ध्वज जर्मनी
राजधानीहानोव्हर
क्षेत्रफळ४७,६२४ चौ. किमी (१८,३८८ चौ. मैल)
लोकसंख्या७९,२२,००० (३१ जुलै २०१२)
घनता१६६ /चौ. किमी (४३० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२DE-NI
संकेतस्थळwww.niedersachsen.de

नीडरजाक्सन (जर्मन: Niedersachsen; इंग्लिश नाव: लोअर सॅक्सनी) हे जर्मनी देशामधील एक राज्य आहे. जर्मनीच्या वायव्य भागात वसलेल्या ह्या राज्याच्या उत्तरेला उत्तर समुद्र, पश्चिमेला नेदरलँड्स देशाचे ओव्हराईजल, ड्रेंथ व ग्रोनिंगन हे प्रांत तर इतर दिशांना जर्मनीची राज्ये आहेत. ४७,६२४ चौरस किमी क्षेत्रफळ व सुमारे ८० लाख लोकवस्ती असलेले नीडरजाक्सन जर्मनीमधील आकाराने दुसऱ्या क्रमांकाचे तर लोकसंख्येच्या दृष्टीने चौथ्या क्रमांकाचे मोठे राज्य आहे. हानोफर ही नीडरजाक्सनची राजधानी व सर्वात मोठे शहर असून ब्राउनश्वाइग, ल्युनेबर्ग, ओस्नाब्र्युक ही इतर मोठी शहरे आहेत.

आजच्या नीडरजाक्सनचा भूभाग १९व्या शतकामध्ये हानोफरचे राजतंत्र ह्या देशाच्या अधिपत्याखाली होता.

बाह्य दुवे