Jump to content

निस्सीम काणेकर

निस्सीम काणेकर (११ सप्टेंबर, १९७३ - ) हे भारतीय खगोलभौतिकशात्रज्ञ आहेत. अणूमधील इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉन यांच्या वस्तुमानाचे गुणोत्तर, दीर्घिकांची निर्मिती आणि विकास, दीर्घिकांच्या अंतर्गत दोन ताऱ्यांमधील अवकाशामध्ये असणारे वायू या विषयांत त्यांनी मूलभूत संशोधन केले आहे. ते टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चच्या नॅशनल सेंटर फॉर रेडियो ॲस्ट्रॉफिजिक्स येथे प्राध्यापक आहेत. ते इंटरनॅशनल ॲस्ट्रॉनॉमिकल युनियनचे सदस्य आहेत आणि सायन्स ॲन्ड टेक्नॉलॉजी विभागाचे सुवर्ण जयंती फेलोशिप मिळवणारे शास्त्रज्ञ आहेत. २०१७ साली वैज्ञानिक संशोधनासाठी भारत सरकारची सर्वोच्च संस्था- वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषद- हिने त्यांना शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार दिला आहे.[]

संदर्भ