निशिकांत मिरजकर
डाॅ. निशिकांत मिरजकर (जन्म : ४ डिसेंबर १९४२) हे लेखक आणि समीक्षक आहेत. दिल्ली विद्यापीठात त्यांनी तुलनात्मक भारतीय साहित्य आणि मराठी साहित्याचे तीस वर्षे अध्यापन केले. त्यांनी मराठीत बारा, हिंदीत सात व इंग्रजीत तीन संशोधनपर ग्रंथांचे लेखन केले आहे. त्यात संतसाहित्य, तुलनात्मक साहित्य आणि भारतीय साहित्यावरील समीक्षात्मक पुस्तकांचा समावेश आहे. विश्वविद्यालय अनुदान आयोग, लोकसेवा आयोग, सरस्वती सन्मान, ज्ञानपीठ पुरस्कार आणि केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड यांचे सल्लागार म्हणून त्यांनी काम केले आहे.
पुस्तके
मराठी
- श्री नामदेव दर्शन (संपादित) (प्रकाशक: नामदेव समाजोन्नती परिषद, कोल्हापूर)
- श्री नामदेव: चरित्र, काव्य आणि कार्य (संपादित) (प्रकाशक: महाराष्ट्र सरकार, मुंबई)
- नामदेवांची अभंगवाणी (संपादित) (प्रकाशक: स्नेहवर्धन प्रकाशन पुणे)
- कवितेची रसतीर्थे (प्रकाशक: संजय प्रकाशन, पुणे)
- काव्यबंध आणि मर्मवेध (प्रकाशक: आकांक्षा प्रकाशन, नागपूर)
- भारतीय भाषांतील स्त्रीसाहित्याचा मागोवा खंड १ आणि खंड २ (सहलेखिका - मंदा खांडगे, नीलिमा गुंडी, विद्या देवधर, प्रकाशक: साहित्यप्रेमी भगिनीमंडळ, पुणे)
- साहित्यगंगा: प्रवाह आणि घाट (प्रकाशक: श्रीविद्या प्रकाशन, सोलापूर)
- बदलते रंग (संपादित) (प्रकाशक: पेङ्ग्विन प्रकाशन, दिल्ली)
- नव्या वाटा नवी वळणे (संपादित) (प्रकाशक: पेङ्ग्विन प्रकाशन, दिल्ली)
- साहित्य: रंग आणि अंतरंग (प्रकाशक: आकांक्षा प्रकाशन, नागपूर)
- तौलनिक साहित्य (प्रकाशक: प्रतिमा प्रकाशन, पुणे)
हिंदी
1. संत नामदेव: जीवन और साहित्य (प्रकाशक: नामदेव जागृती मिशन, गुरुग्राम)
2. नियतिदान (संपादन) (प्रकाशक: जी.ए. मित्रमंडल, दिल्ली)
3. विज्ञानेश्वरी (अनुवाद) (प्रकाशक: भारतीय ज्ञानपीठ, दिल्ली)
4. सावरकर समग्र भाग 1 से 10 (संपादन) (प्रकाशक: प्रभात प्रकाशन, दिल्ली)
5. महाभारत: एक चींटी का (अनुवाद) (प्रकाशक: साहित्य अकादमी, दिल्ली)
6. क्रांतिदर्शी कुसुमाग्रज (संपादन) (प्रकाशक: महाराष्ट्र परिचय केंद्र, दिल्ली)
7. सावरकर की कविताए (अनुवाद) (प्रकाशक: प्रभात प्रकाशन, दिल्ली)
English
1. Marathi Literature: An Outline Published by Maharashtra Information Centre, New Delhi
2. Kusumagraj Published by Sahitya Akademi, New Delhi
3. Women’s Literature in Indian Languages (Ed. Vol : I and II, सहलेखिका - मंदा खांडगे, नीलिमा गुंडी, विद्या देवधर, शुभांगी रायकर) Published by Sahityapremi Bhagini Mandal, Pune
पुरस्कार आणि सन्मान
- मिरजकर यांना राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
- पुणे शहरात २४-२५ डिसेंबर २०१७ या काळात होणाऱ्या साहित्यिक कलावंत संमेलनाचे अध्यक्षपद.