निलीमकुमार खैरे
निलीमकुमार खैरे |
---|
निलीमकुमार खैरे हे मराठी सर्पतज्ज्ञ, लेखक आहेत. महराष्ट्रात पुण्यामध्ये कात्रज येथे सर्पोद्यान उभारण्यात त्यांचा मोठा वाटा आहेत. खैरे सध्या कात्रज सर्पोद्यानाचे संचालकपद सांभाळत आहेत. महाराष्ट्रात सापांविषयी जागृती वाढवण्यासाठी गावोगावी, शाळा-महाविद्यालयात जाऊन सापांविषयी माहिती देणे, साप कसे ओळखावेत, साप चावल्यावर कोणते उपचार करावेत, साप कसे हाताळावेत यावर मार्गदर्शन व प्रात्यक्षिके देऊन त्यांनी सातत्याने काम केले आहे. सापांविषयी जागृतीसाठी त्यांनी पुण्यात ७२ विषारी सापांसोबत ७२ तास हा आव्हानात्मक कार्यक्रम आयोजला होता. या कार्यक्रमात त्यांनी ७२ तास विविध जातींच्या ७२ विषारी सापांसोबत काचेच्या खोलीत राहून दाखवले.
त्यांनी स्थापलेल्या सर्पोद्यानात अनेक प्रकारांचे विषारी, बिनविषारी साप, तसेच सापांचे शत्रू असलेले जीव आहेत. त्यांनी सर्पोद्यानासोबतच वन्य प्राण्यांचे अनाथालयही चालवले आहे. रस्त्यात अथवा जंगलात सापडलेल्या जखमी वन्य प्राण्यांवर येथे शुश्रूषा व उपचार केले जातात व बरे झाल्यावर त्यांची रवानगी पुन्हा निसर्गात केली जाते.