Jump to content

निर्वाण

निर्वाण (पाली : निब्बान; प्राकृत : णिव्वाण) ही मोक्षासोबत मनाला मिळणाऱ्या असीम शांतीसाठी भारतीय धर्मांमध्ये वापरली गेलेली प्राचीन संस्कृत संज्ञा आहे. श्रमण मतात ही दुःखापासून मुक्त झाल्याची अवस्था आहे. हिंदू तत्त्वज्ञानात ही ब्रह्माशी (सर्वोच्च सत्तेशी) झालेल्या एकरूपतेची अवस्था आहे.[]

निर्वाणाचा शब्दशः अर्थ "विझून जाणे" (मेणबत्तीप्रमाणे) असा होतो आणि बौद्धमताच्या संदर्भात त्याचा अर्थ इच्छा, माया, भ्रम यांच्या आगी विझून गेल्यानंतर मिळणारी मनाची अक्षुण्ण शांतता असा होतो.– भारतीय दर्शन शास्त्रातील नास्तिक दर्शनामध्ये बौद्ध दर्शनाचा समावेश होतो. बौद्ध तत्त्वज्ञानात जीवन विषयक जो विचार मांडला आहे त्यामध्ये निब्बाण – निर्वाण हा शब्द येतो. या शब्दाच्या अनेक अर्थछटा आहेत. त्यातील एक अर्थ समाधान, तृप्ती, सुख, आनंद असाही आहे. वस्तुतः निब्बाण म्हणजे विझणे, नष्ट होणे, मृत्यू, मोक्ष इत्यादी. निर्वाण शब्दा्चे समाधान, तृप्ती, सुख, आनंद हेही अर्थ आहेत. तथागतांनी निब्बान विषयी भंते पटीसेन यांना उपदेश करताना म्हणले जो राखूण बोलतो,विचारांचा संयम करतो,जो आपल्या देहाने दुसऱ्यास उपद्रव करीत नाही असा मनुष्य निब्बान मिळवू शकतो.

बौद्ध तत्त्वज्ञानात निर्वाणाचे उपाधिशेष व निरूपाधिशेष असे दोन प्रकार मानले आहेत.

  1. निरूपाधिशेष निर्वाण – म्हणजे अंतिम मुक्ती, अर्हत पदाची प्राप्ती
  2. उपाधिशेष निर्वाण – मनुष्य जिवंत असताना प्राप्त होणारे निर्वाणपद. जिथे अज्ञान वासनांचा नाश होतो. (संदर्भ - तत्त्वज्ञान कोश)

संदर्भ व नोंदी

  1. ^ Richard Gombrich, Theravada Buddhism: A Social History from Ancient Benāres to Modern Colombo. Routledge