निरंजन ज्योती
भारतीय राजकारणी | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | इ.स. १९६७ हमीरपूर | ||
---|---|---|---|
नागरिकत्व | |||
व्यवसाय | |||
राजकीय पक्षाचा सभासद | |||
पद |
| ||
| |||
साध्वी निरंजन ज्योती (जन्म १ मार्च १९६७) ह्या भारतीय जनता पक्ष (भाजप) च्या राजकारणी आहेत. नोव्हेंबर २०१४ मध्ये त्यांची अन्न प्रक्रिया उद्योग राज्यमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. [१] ३० मे २०१९ रोजी, त्यांची नरेंद्र मोदी मंत्रिमंडळात ग्रामीण विकास मंत्रालयात राज्यमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली.
२०१२ च्या निवडणुकीत विजयी झाल्यानंतर त्या उत्तर प्रदेश विधानसभेत हमीरपूर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत होत्या.[२] २०१४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत विजयी झाल्यानंतर त्यांनी लोकसभेत उत्तर प्रदेशातील फतेहपूर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले.[३]
आयुष्य आणि कारकीर्द
निरंजन ज्योती यांचा जन्म १ मार्च १९६७ रोजी उत्तर प्रदेशातील हमीरपूर जिल्ह्यातील पटेवरा गावात झाला. त्यांचे वडील अच्युतानंद आणि आई शिव काली देवी आहे. [३] त्यांचा जन्म निषाद जातीच्या कुटुंबात झाला. [१]
१४ जून २०१४ रोजी भानू पटेल नावाच्या एका व्यक्तीने आणि त्याच्या तीन साथीदारांनी ज्योतीवर गोळीबार केला जेव्हा त्या लखनौ येथील आवास विकास कॉलनीमध्ये एका कार्यक्रमातून परतत होत्या. त्या सुरक्षितपणे बचावल्या पण त्यांचा अंगरक्षक जखमी झाला. [४]
त्या विश्व हिंदू परिषदेच्या केंद्रीय सचिव आणि उत्तर प्रदेशातील भाजपच्या राज्य सचिव होत्या. मे २०१९ मध्ये, ज्योती ग्रामीण विकास राज्यमंत्री बनल्या. [५]
वैयक्तिक मते आणि विवाद
१ डिसेंबर २०१४ रोजी, [६] त्यांनी एका जाहीर सभेत, "दिल्लीतील सरकार रामाच्या मुलांनी चालवायचे की हरामीच्या हे तुम्हीच ठरवायचे आहे" असे विरोधी पक्षनेत्यांचा उल्लेखात त्या बोलल्या. [७] या विधानामुळे संसदेत गदारोळ झाला. [८] त्यानंतर त्यांनी आपल्या वक्तव्यावर खेद व्यक्त केला आणि माफी मागीतली.[६]
संदर्भ
- ^ a b "From storyteller to minister; Sadhvi Niranjan Jyoti". The Indian Express. 12 November 2015. 24 November 2015 रोजी पाहिले.
- ^ "Sadhvi Niranjan Jyoti". 2021. 10 April 2022 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 10 April 2022 रोजी पाहिले.
- ^ a b "Jyoti,Sadhvi Niranjan". Lok Sabha. 24 November 2015 रोजी पाहिले.
- ^ "BJP MP Sadhvi Niranjan Jyoti attacked, escapes unhurt". The Economic Times. 15 June 2015. 24 November 2015 रोजी पाहिले.
- ^ PM Modi allocates portfolios. Full list of new ministers
- ^ a b "After abusive rant, Union minister Sadhvi Niranjan Jyoti expresses regret in Parliament". India Today. 2 December 2014. 24 November 2015 रोजी पाहिले.
- ^ "Ramzada vs haramzada: Outrage over Union Minister Sadhvi's remark". The Indian Express. 2 December 2014. 24 November 2015 रोजी पाहिले.
- ^ "After uproar in House, Sadhvi Niranjan Jyoti says she is ready to apologise for 'haramzadon' remark". The Indian Express. 2 December 2015. 24 November 2015 रोजी पाहिले.