नियुत
मराठीत ज्या संख्येला दशलक्ष किंवा दहा लाख म्हणतात त्या संख्येला भास्कराचार्य प्रयुत म्हणतात तर काही जण(कोण?) नियुत म्हणतात. भास्कराचार्य दहा हजार या संख्येला अयुत म्हणतात. आर्यभटीय व शुक्ल-यजुर्वेद या ग्रंथांत नियुत म्हणजे एक लाख आणि प्रयुत म्हणजे दहा लाख. जगन्नाथपंडितसुद्धा एक लाख या संख्येला नियुत म्हणतो.
उदाहरणार्थ, जगन्नाथपंडितकृत लक्ष्मीलहरी स्तोत्रात नियुत हा शब्द एक लाख अशा अर्थाने आला आहे.
समुन्मीलत्वन्तःकरणकरुणोद्गारचतुरः
करिप्राणत्राणप्रणयिनि दृगन्तस्तव मयि।
यमासाद्योन्माद्यद्विपनियुतगण्डस्थलगल-
न्मदक्लिन्नद्वारो भवति सुखसारो नरपतिः॥२॥
- अयुत = १०,००० दहा हजार
- नियुत = १,००,००० एक लाख
- प्रयुत = १०,००,००० दहा लाख