निफाड विधानसभा मतदारसंघ
निफाड विधानसभा मतदारसंघ - १२१ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, निफाड मतदारसंघात नाशिक जिल्ह्याच्या निफाड तालुक्यातील चांदोरी, पिंपळगांव बसवंत, रानवड, निफाड आणि सायखेडा ह्या महसूल मंडळांचा समावेश होतो. निफाड हा विधानसभा मतदारसंघ दिंडोरी लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२]
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिलीपराव शंकरराव बनकर हे निफाड विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]
आमदार
वर्ष | आमदार[४] | पक्ष | |
---|---|---|---|
२०१९ | दिलीपराव शंकरराव बनकर | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष | |
२०१४ | अनिल साहेबराव कदम | शिवसेना | |
२००९ | अनिल साहेबराव कदम | शिवसेना |
निवडणूक निकाल
महाराष्ट्र विधानसभा निवडणुक २००९ | ||
---|---|---|
निफाड | ||
उमेदवार | पक्ष | मत |
अनिल साहेबराव कदम | शिवसेना | ९०,०६५ |
दिलीपराव शंकरराव बनकर | राष्ट्रवादी | ५६,९२० |
यतीन रावसाहेब कदम | मनसे | ५,४५७ |
राजेंद्र सदाशिव डोखळे | स्वाप | ४,५३१ |
केदू ताऊजी विस्ते | अपक्ष | १,५२७ |
पंडित भिमराव लोखंडे | बसपा | १,०४९ |
नंदकुमार शिवाजी वाघ | अपक्ष | ८१७ |
पांडुरंग मुरलीधर पगार | भाबम | ३०३ |
संदर्भ
- ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). 2009-02-19 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). १२ October २००९ रोजी पाहिले.
- ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
- ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
- ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".