निकोलस क्रीड
निकोलस सी. क्रीड (मूळ नाव:विल्यम हार्वी; १८४३ - १२ जुलै, १८९७) हा अमेरिकन खनिजशोधक होता. याने १८८० आणि १८९० च्या दशकांमध्ये कॉलोराडोमधील होली मोझेस रत्नांची खाण आणि अनेक चांदीच्या खाणी शोधून काढल्या. कॉलोराडोतील क्रीड शहराला याचे नाव दिलेले आहे.