नाशिक परिसरातील धार्मिक व प्रेक्षणीय स्थळे
नाशिक हे धार्मिक व प्रेक्षणीय स्थळांसाठी प्रसिद्ध आहे.
- त्र्यंबकेश्वर हे १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. हे स्थळ नाशिकपासून २७ कि.मी. अंतरावर आहे.
- अंजनेरी हे हनुमानाचे जन्मस्थान नाशिकपासून २० कि.मी. अंतरावर आहे.
- सप्तशृंगीदेवी साडेतीन शक्तीपीठ पैकि अर्धे पीठ. हे स्थळ नाशिकपासून ५२ कि.मी. अंतरावर आहे.
- साल्हेर किल्ला बागलाण
- मुल्हेर किल्ला बागलाण
- मांगीतुंगी तीर्थक्षेत्र बागलाण जगातील सर्वात मोठी 108 फुटाची उंच भगवान वृषभदेव मूर्ती
- पांडवलेणी - सुमारे १२०० वर्षांची जुनी लेणी नाशिक शहरात आहेत.
- फाळके स्मारक - दादासाहेब फाळके यांचे स्मारक पांडवलेण्यांजवळ आहे.
- राम कुंड - गोदावरी नदीवरील एक कुंड, कुंभमेळ्याच्या पर्वात येथे एक स्नान केल्याने पापे नाहिशी होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
- सीता गुंफा - राम, सीता यांची वनवासातील वास्तव्याची जागा.
- काळा राम मंदिर - रामाचे काळ्या पाषाणात बनवलेले प्राचीन मंदिर
- सादिकशाह हुसेनी बाबा दर्गा शरीफ.
- कळसूबाई शिखर हे देवीचे स्थान व महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर, ५२ कि.मी. अंतरावर आहे.
- सोमेश्वर येथे प्रसिद्ध शिवमंदिर आहे, तसेच मंदिरा पासून गंगापूर गावाच्या दिशेने गेल्यास थोड्याच अंतरावर नवीन तिरुपती बालाजी मंदिर बांधण्यात आले आहे. मंदिरालगतच असलेला धबधबा सोमेश्वरचा धबधबा म्हणून प्रसिद्ध आहे.
- सातपूरनजीक चुंचाळे गावात प्रसिद्ध दक्षिणमुखी हनुमान मंदिर आहे.
- कपालेश्वर मंदिर - नंदी नसलेले शिवमंदिर
- एक मुखी दत्तमंदिर.
- मुक्तिधाम (नाशिक रोड)
- भक्तिधाम (पेठ नाका)
- नवश्या गणपती
- चामर लेणी सुमारे १२०० वर्ष जुनीं लेणी आहे.
- रामशेज किल्ला
- इच्छामणी गणपती (उपनगर )
- आगर टाकळी, समर्थ रामदासांनी स्थापलेला मारूती; समर्थांचे १२ वर्षे वास्तव्य
- कालिका मंदिर, नाशिकचे ग्रामदैवत
- विल्होळी जैन मंदिर
- रविवार कारंजा गणेशोत्सव मंडळ (चांदीचा गणपती)
- ब्रह्मगिरी हे गोदावरीचे उगमस्थान आहे. त्या जवळच श्रीचक्रधर स्वामींच्या पदस्पर्शाने पुनीत झालेले स्थान आहे
- पंचवटीत अहिल्यादेवी पुलाजवळ श्रीचक्रधर स्वामींचे मंदिर आहे.
- नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील पूर्व भागात संत पाटील बाबा महाराज मंदिर आणि त्यांनी बांधलेले पुरातन श्री विठ्ठल मंदिर वारकरी संप्रदायाचे श्रद्धास्थान आहे. संत पाटील बाबांनी अठराव्या शतकात निवृत्तीनाथ महाराज समाधीचा शोध लावला. त्यांनी महाराष्ट्रात वारकरी संप्रदाय भरभराटीस आणला.