नालंदा
बौद्ध तीर्थस्थळे |
---|
चार मुख्य स्थळे |
चार अतिरिक्त स्थळे |
इतर स्थळे |
|
नंतरची स्थळे |
|
नालंदा हे भारतातील प्राचीन शहरांपैकी एक होते. ते सध्याच्या बिहार राज्यात येते. याठिकाणीच नावाजलेले नालंदा विद्यापीठही होते. बिहारमध्ये नालंदा या नावाने जिल्हा असून त्या जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र बिहार शरीफ हे आहे.
इतिहास
नालंदा हा मुख्यतः बौद्धविहार होता. बुद्धांच्या शिकवणुकीचा प्रसार करण्याचे ते एक केंद्र होते; त्यामुळे शेकडो बौद्धभिक्षू या ठिकाणी ज्ञानार्जन करण्यासाठी येत. येथे सर्व विद्या, सर्व शास्त्रे यांचे शिक्षण मिळत असे. या विद्यापीठाला तसेच तोलामोलाचे आचार्य लाभले. त्यापैकी काही प्रसिद्ध नावे - नागार्जुन, असंग, शीलभद्र, धर्मपाल, चंद्रपाल, जिनमित्र अशी आहेत. या विद्यापीठाचे अनेक आचार्य देशोदेशी जाऊन बौद्ध धर्मप्रसाराचे काम करीत होते. शांतरक्षित, पद्मसंभव, कमलशील, स्थिरमती हे तिबेटला गेले. कुमारजित, परमार्थ, शुभकर, धर्मदेव हे चीन व कोरियाला गेले व या विद्यापीठाची कीर्ती सर्वत्र पसरली. [१]
हे सुद्धा पहा
- ^ गायधनी, रं. ना. (२०१५). प्राचीन भारताचा इतिहास. पुणे: अनिरुद्ध पब्लिशिंग हाऊस. pp. ३३१. ISBN 978-93-84730-42-0.