Jump to content

नारायण श्रीधर बेंद्रे

नारायण श्रीधर बेंद्रे

पूर्ण नावनारायण श्रीधर बेंद्रे
जन्मऑगस्ट २१, १९१०
इंदूर, मध्य प्रदेश, भारत
मृत्यू१९९२
मुंबई, महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्वभारत भारतीय
कार्यक्षेत्रचित्रकला, कलाअध्यापन
प्रशिक्षणजे.जे. स्कूल ऑफ आर्ट, मुंबई
पुरस्कारपद्मश्री पुरस्कार (१९६९)

नारायण श्रीधर बेंद्रे (ऑगस्ट २१, १९१० - १९९२) हे विसाव्या शतकातील मराठी, भारतीय चित्रकार होते.

जीवन

बेंद्र्यांचा जन्म ऑगस्ट २१, १९१० रोजी इंदुरात झाला. शालेय शिक्षण इंदुरात झाल्यावर त्यांनी आग्रा विद्यापीठातून बी.ए. पदवी मिळवली. त्यानंतर इंदुरातील ’स्टेट आर्ट स्कूल’ येथे त्यांनी चित्रकलेचे प्राथमिक प्रशिक्षण घेतले. मुंबईच्या ’जे.जे. स्कूल ऑफ आर्ट’मधून १९३३ साली त्यांनी जी.डी.आर्ट अभ्यासक्रम पूर्ण केला. १९४० साली चित्रपटांतील कलादिग्दर्शन करण्याच्या निमित्ताने त्यांनी चेन्नईला प्रयाण केले. १९४७-१९५० दरम्यान त्यांनी युरोप, जपान, मध्यपूर्व, अमेरिकेची संयुक्त संस्थाने इत्यादी देशांतून प्रवास केला. १९५० साली भारतात परतल्यावर बडोद्यातील महाराजा सयाजीराव विद्यापीठात ललितकला विभागातील चित्रकला उपविभागाचे अध्यापकपद स्वीकारले व पुढे तेथेच ’डीन’पददेखील सांभाळले. १९६९ साली भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने त्यांना गौरविले.[ संदर्भ हवा ]

१९९२ साली मुंबईत त्यांचे निधन झाले.

कार्य

बाह्य दुवे