नारायण यशवंत देऊळगावकर
जन्म | नारायण यशवंत देऊळगावकर ऑगस्ट २२, १९२० पुणे, महाराष्ट्र, भारत |
---|---|
मृत्यू | जून ३, २००८ नागपूर, महाराष्ट्र, भारत |
इतर नावे | अण्णा |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | पटकथालेखन |
भाषा | मराठी |
प्रमुख चित्रपट | दे दणा दण |
नारायण यशवंत देऊळगावकर (ऑगस्ट २२, १९२०-जून ३, २००८) हे मराठी चित्रपटसृष्टीतील पटकथालेखक होते.
जीवन
देऊळगावकरांचा जन्म ऑगस्ट २२, १९२० रोजी पुण्याच्या डेक्कन जिमखाना परिसरात झाला. अखेरच्या काही वर्षांतील नागपुरातील वास्तव्य वगळता त्यांचे वास्तव्य पुण्यातच होते. मराठी व संस्कृत या विषयांमध्ये त्यांनी एम.ए. पदवी मिळवली.
जून ३, २००८ रोजी नागपुरात दीर्घ आजाराने त्यांचे निधन झाले.
कारकीर्द
देऊळगावकरांनी ४० वर्षांच्या कारकिर्दीत २५हून अधिक चित्रपटांच्या पटकथा व ५०हून अधिक गीते लिहिली. 'सीता स्वयंवर' व 'माया बाजार' या गाजलेल्या मराठी चित्रपटांसाठी ग.दि. माडगूळकरांसोबत त्यांनी चित्रपट व्यवसायात पहिले पाऊल ठेवले. 'झाकली मूठ' या चित्रपटापासून अण्णांच्या स्वतंत्र कारकिर्दीला सुरुवात झाली.
चित्रपट: पटकथालेखन
- पैशाचा पाऊस
- सतीचं वाण
- थापाड्या
- सासुरवाशीण
- धूमधडाका
- माहेरची साडी
- खट्याळ सासू नाठाळ सून
- नवरा बायको नशीबवान
- सतीची पुण्याई
- लेक चालली सासरला
- नशीबवान
- सुभद्राहरण
- दे दणा दण
संकीर्ण माहिती
प्रीती वडनेरकर या लेखिका देऊळगावकरांच्या कन्या आहेत.